पिंपरीतील दोन गुन्हेगारी टोळ्यांवर 'मोका' दाखल

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 12 January 2021

त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. त्यास मंगळवारी (ता.12) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मंजुरी दिली. 

पिंपरी : निगडी आणि पिंपरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दोन गुन्हेगारी टोळ्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमांतर्गत (मोका) कारवाई करण्यात आली. 

पिंपरी ठाण्याच्या हद्दीतील धर्मेश उर्फ धरम्या शामकांत पाटील (वय 25, रा. गोकुळधाम हौसिंग सोसायटी, पिंपरी, पुणे), स्वप्नील संजय कांबळे (वय 28, रा. आदर्शनगर, पिंपरी), सोनू विनोद पारचा (वय 30, रा. मिलिंदनगर, पिंपरी), रशीद इर्शाद सय्यद (वय 26, रा. बालामल चाळ, श्रमिकनगर, पिंपरीगाव), राज दत्ता चौरे (रा. संतोष हौसिंग सोसायटी, मिलिंदनगर, पिंपरी) या टोळीवर कारवाई करण्यात आली. 

आवास योजनेची सोडत रद्द केल्याने गोंधळ; आयुक्तांवर माफी मागण्याची नामुष्की​

तर निगडी ठाण्याच्या हद्दीतील अमोल बसवराज वाले (वय 23), मेघराज उर्फ राज संजय वाले (वय 25), आनंद बसवराज वाले (वय 29, सर्व रा. इंदिरानगर, ओटास्कीम, निगडी) या टोळीवर कारवाई झाली. या दोन्ही टोळ्या वर्चस्वासाठी आणि आर्थिक फायद्यासाठी टोळी बनवून संघटितपणे गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. त्यास मंगळवारी (ता.12) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मंजुरी दिली. 

- पिंपरी-चिंचवडमधील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Action was taken against two criminal gangs in Nigdi and Pimpri police stations under MCOCA act