Video : पिंपरीत स्थलांतरित कामगारांची मेधा पाटकर यांच्याकडून विचारपूस 

Video : पिंपरीत स्थलांतरित कामगारांची मेधा पाटकर यांच्याकडून विचारपूस 
Updated on

पिंपरी : पिंपरी-चिंचवडसह पुणे जिल्ह्यातील हजारो परप्रांतीय, स्थलांतरित कामगार पायी शेकडो मैल चालतच आहेत. त्यांची खास विचारपूस करण्यासाठी नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी पिंपरी-चिंचवड शहराला धावती भेट दिली. कामगारांनी परराज्यात, मूळगावी परतत असताना पायी चालत न जाता उपलब्ध असलेल्या बस-रेल्वेचा वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

स्थलांतरित, कष्टकरी, घरेलू कामगार, मजूर, फेरीवाला अशा सर्व असंघटित कामगारांची संवाद साधत, त्यांना मिळणारे वेतन, ठेकेदाराकडून झालेली फसवणूक आणि रेशनिंग व्यवस्था यावर चर्चा केली. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अनेक मजूर किंवा कामगार यांच्या जवळ छोटीशी एअरबॅग, त्यांची अगदी लहान किंवा शाळकरी मुले आणि पत्नीकडे लहानशी पिशवी असे सगळे कुटुंब चालत निघालेले दिसत आहे. ज्यांची कुटुंबं गावाकडे आहेत, असे काही मजूर, कामगार एकटेच निघाले आहेत. मजूरांचा अस्वस्थ करणाऱ्या प्रवासामुळे पाटकर यांनी भेट देण्याचे ठरविले. सोबत कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, इब्राहिम खान, महिला विभागाच्या माधुरी जलमूलवार, उमेश डोर्ले, नाना कसबे, इरफान चौधरी, अर्चना कांबळे, सुमन अहिरे , तुकाराम माने आदींसह त्यांनी विविध ठिकाणचे कामगारांच्या भेटी घेतल्या. त्यांच्या समस्या समजून घेत त्यांना पायी प्रवास करू नका, अस्वस्थ होऊ नका, असे त्यांना उभारी देण्याचा प्रयत्न त्यांनी केला.

पाटकर म्हणाल्या, की रेशन व्यवस्था सुरळीत झाली पाहिजे. प्रत्येकाला शिधा मिळाली पाहिजे. केंद्र व राज्य सरकार यासाठी अनुकूल असून सुद्धा प्रत्यक्षात दुकानदाराकडून आणि स्थानिक प्रशासनाकडून त्याला प्रतिसाद मिळत नाही. कामगारांच्या हक्काचं रेशन मिळत नाही, ही परिस्थिती बदलणे आवश्‍यक आहे. त्याचबरोबर कामगारांनी रेशनिंग व्यवस्थेत बदल असणाऱ्या तक्रारी मांडल्या पाहिजेत. शहर आणि जिल्ह्याच्या परिसरात विविध ठिकाणी पायी चालत जाताना कामगार दिसत आहेत. त्यांना कार्यकर्त्यांनी व प्रशासनाच्या प्रतिनिधीने संबंधित पोलिसांना संपर्क करून त्यांना इच्छित स्थळी पाठवण्यासाठी सहकार्य करण्याची गरज आहे. या पायी चालल्यामुळे अनेकांचे अपघात झाले आहेत, जखमी होऊन अनेक लोकांचे मृत्यू झालेले आहेत. कामगारांना सुखरूप त्यांच्या घरी पोहोचवण्याची सरकारने व्यवस्था करणे गरजेचे आहे, असेही पाटकर यांनी नमूद केले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com