मावळ : पवना परिक्रमा पूर्ण करणारे 'हे' ठरले पहिले

मावळ : पवना परिक्रमा पूर्ण करणारे 'हे' ठरले पहिले

वडगाव मावळ : शिवप्रेमींनी कोणताही संकल्प केल्यास तो तडीस नेल्याशिवाय ते राहत नाहीत. येथील गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्थेच्या कार्यकर्त्यांनी असाच पवना धरण परिक्रमा करण्याचा संकल्प केला व ५६ किमी अंतराची ही परिक्रमा दोन दिवसात पूर्ण करून केलेला संकल्प यशस्वीरीत्या तडीस नेला. 

१९७२ साली बांधून पूर्ण झालेल्या पवना धरणाची परिक्रमा पाहिल्यांदाच कोणीतरी पूर्ण केली आहे. वास्तविक पवना धरणाचा व्यास हा ७९ किलोमीटर अंतराचा आहे. परंतु, पाणीसाठा कमी झाल्याने व पाण्याजवळून चालत गेल्याने हे अंतर ५६ किलोमीटर भरले. वडगाव मावळ येथील गड भटकंती दुर्गसंवर्धन संस्था गेल्या तीन वर्षांपासून पवन मावळातील तिकोना किल्ल्याचे दुर्ग संवर्धन करत आहे. त्यांनी या कालावधीत किल्ल्यावर विविध कामे केली आहेत. संस्थेचे कार्यकर्ते दर वर्षी पावसाळ्यात मावळ तालुक्यातील माळेगाव ते भीमाशंकर असा ट्रेक करतात. यंदा त्यांनी पवना धरणाची परिक्रमा करण्याचा संकल्प केला होता.    

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भटकंतीच्या सदस्यांनी १३ तारखेला सायंकाळी ४ वाजता पवना धरणाच्या मुख्य भिंतीलगत असलेल्या ब्राम्हणोली गावापासून धरणातील पाण्याचे जलपूजन व शिवरायांचा जयघोष करून परिक्रमेला सुरुवात केली. ब्राम्हणोली, ठाकूरसाई, वाघेश्वर, चावसर, तुंग या गावांच्या कडेने धरणातून प्रवास केला व कोळे या गावात रात्री १० वाजता पोचून तेथे मुक्काम केला. पहिल्या दिवशी त्यांनी २० किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला. या प्रवासा दरम्यान त्यांना नऊ महीने धरणाच्या पाण्यात बुडणाऱ्या व तीन महिने पाण्याच्या बाहेर असणाऱ्या वाघेश्वर मंदिराचे दर्शन घडले. वाघेश्वर गावातील मंदिरापासून दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजता त्यांनी पुन्हा परिक्रमेला सुरवात केली. चाफेसर , केवरेवाडी , आपटी , गेवंढे, पाले, शिंदगाव , आंबेगाव , काळेकॉलनी , ब्राम्हणोली असा दुसऱ्या दिवशी ३६ किलोमीटर अंतराचा प्रवास पूर्ण केला व एकूण ५६ किलोमीटर अंतराची पवना परिक्रमा यशस्वीरीत्या पूर्ण केली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या परिक्रमेत त्यांना अनेक ऐतिहासिक वस्तूंचे तसेच सर्प, ससे, भेकर आदी प्राण्यांचे दर्शन झाले. मावळी रानमेव्याचाही त्यांनी आस्वाद घेतला. वारा, पाऊस, अंधाराचा सामना करावा लागला. या मोहिमेत ऍड. मारुती आबा गोळे, श्रीनिवास कुलकर्णी, सचिन ढोरे, गणेश जाधव, ऍड. अजित वहिले, ऍड. रवि विनोदे, हनुमंत जांभुळकर,  विशाल शिंदे, अंकेष  ढोरे, सचिन इंगळे, सागर थरकुडे, प्रशांत सालकर, संतोष कडू, कुमार ओंकार कडू असे चौदा जण सहभागी झाले होते. परिक्रमेचा प्रवास खडतर परंतु मनाला अतिशय आनंद देणारा होता अशी प्रतिक्रिया ऍड. रवी विनोदे व गणेश जाधव यांनी दिली. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com