पर्यावरण संवर्धणासाठी लोणावळ्यात 'सायकल डे'; अभिनेते सुनील शेट्टीने दाखवला हिरवा झेंडा

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 12 January 2021

सरकारच्यावतीने सुरू असलेल्या माझी वसुंधरा अभियान सुरू आहे. लोणावळा नगरपरिषदेने स्वच्छ सर्वेक्षण अभियानात सहभाग घेतला आहे. स्वच्छता जनजागृती व पर्यावरणातील प्रदूषण रोखण्यासाठी सायकल रॅलीच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. 

लोणावळा :  वृक्ष लावणे काळाची गरज असून प्रत्येकाने एक तरी झाड लावावे असे आवाहन प्रसिद्ध सिने अभिनेते सुनील शेट्टी यांनी केले. लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने पर्यावरण संवर्धन, प्रदूषण स्वच्छतेचा कानमंत्र घरोघरी पोचावा, यासाठी मंगळवारी (ता. १२) 'सायकल डे चे आयोजन करण्यात आले. लोणावळा नगरपरिषद कार्यालयापासून प्रसिद्ध सिने अभिनेते सुनील शेट्टी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सायकल फेरीस सुरुवात झाली.  यावेळी सुनील शेट्टी बोलत होते. 

नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष सुधीर शिर्के, मुख्याधिकारी रवि पवार, नगरसेवक राजु बच्चे, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी,  देविदास कडू, माणिक मराठे, शिवदास पिल्ले, निखिल कविश्वर, ब्रिंदा गणात्रा, मंदा सोनवणे, रचना सिनकर, संध्या खंडेलवाल, आरोही तळेगावकर, विशाल पाडाळे, भाजपाचे शहराध्यक्ष रामविलास खंडेलवाल आदी  यांच्यासह लोणावळा सायकलिंग क्लबचे सदस्य, शिवदुर्ग मित्र, मावळ वार्ता फाऊंडेशनने या रॅलीत सहभाग घेतला. शेट्टी म्हणाले, देशाच्या पंतप्रधानांनी स्वच्छ भारत, स्वस्थ भारत चा नारा दिला आहे, देशभरात तसेच होत आहे, स्वच्छतेच्या बाबतीत नागरिकांमध्ये जागरूकता येत आहे.

"सीरम'ला लसीची पहिली "ऑर्डर'; एक कोटी दहा लाखडोस पुरविणार

सरकारच्यावतीने सुरू असलेल्या माझी वसुंधरा अभियान सुरू आहे. लोणावळा नगरपरिषदेने स्वच्छ सर्वेक्षण अभियानात सहभाग घेतला आहे. स्वच्छता जनजागृती व पर्यावरणातील प्रदूषण रोखण्यासाठी सायकल रॅलीच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. 

लोणावळा नगरपरिषद कार्यालय ते कुमार चौक, गवळीवाडा, इंदिरानगर, तुंगालीं, वलवण, नांगरगाव, भांगरवाडी, रायवूड कॉर्नर, भुशी धरण, आयएनएस शिवाजी गेट अशी सायकल फेरी काढण्यात आली. सायकल रॅलीत सहभागींना  नगरसेवक राजू बच्चे, माजी नगरसेवक प्रमोद गायकवाड यांच्या वतीने पदक देण्यात आले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
 

‘एक दिवस  'नो वेहिकल डे'  पाळावा’

लोणावळा शहरातील प्रदूषण कमी व्हावे, वाहतूक कोंडी टळावी, पर्यावरण संवर्धन व्हावे यासाठी नागरिकांनी आठवड्यातील किमान एक दिवस 'नो वेहिकल डे' पाळावा असे आवाहन करण्यात आले. वाहनांचा वापर टाळत सायकल किंवा पायीच फिरावे व लोणवळेकरांनी नगरपरिषदेच्या उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी केले होते.

युवक दिन विशेष : कौशल्यासह हवा काम करण्याचा दृढ निश्‍चय


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Actor Sunil Shetty Present for Cycle Day in Lonavala for environmental conservation