esakal | Pimpri : गुरुवारपासून शहरात आधार-नोंदणी विशेष मोहीम
sakal

बोलून बातमी शोधा

Pimpri : गुरुवारपासून शहरात आधार-नोंदणी विशेष मोहीम

Pimpri : गुरुवारपासून शहरात आधार-नोंदणी विशेष मोहीम

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : सामान्य नागरिकांच्या सोयीसाठी टपाल विभागाच्यावतीने ता.९ आणि ११ सप्टेंबर दरम्यान “आधार-नोंदणी, अद्यतन आणि मोबाईल लिंकिंग” साठी “विशेष मोहीम” राबविली जाणार आहे. या विशेष मोहीम दरम्यान नवीन आधार नोंदणी, आधार मोबाईल नंबर ला जोडणे, आधार बायोमेट्रिक अपडेट करणे इत्यादी कामे त्वरित केली जातील. नागरीकांनी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन पुणे शहर पूर्व विभागाचे प्रवर अधीक्षक गोपराजु सतीश यांनी केले आहे.

प्रवर अधीक्षक सतीश यांनी सांगितले की, ‘‘या मोहिमेत चिंचवड पूर्व पोस्ट ऑफिस, चिंचवडगाव पोस्ट ऑफिस, औंध कॅम्प पोस्ट ऑफिस, खडकी पोस्ट ऑफिस, पी पिंपरी पी. एफ. पोस्ट ऑफिस, पिंपरी कॉलनी पोस्ट ऑफिस, पी.सी.एन.टी पोस्ट ऑफिस, भोसरीगाव पोस्ट ऑफिस, तसेच पुणे मुख्य डाकघर (जी.पी.ओ .), मार्केट यार्ड पोस्ट ऑफिस, येरवडा पोस्ट ऑफिस, हडपसर पोस्ट ऑफिस येथे विशेष सुविधा करण्यात आली आहे. ’’

हेही वाचा: "डिस्को, पब ही आरोग्य केंद्र आहेत का?"; ठाकरेंना भाजपचा सवाल

चिंचवड जनसंपर्क अधिकारी के. एस. पारखी म्हणाले, ‘‘या विशेष मोहिमेत दरम्यान पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील सर्व डाकघरांमध्ये आधार नोंदणी, अद्यतन आणि आधार मोबाईल लिंकिंग ची सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. सर्व नागरिकांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी त्वरित नजीकच्या पोस्ट ऑफिस ला भेट द्या किंवा आपल्या परिसरातील पोस्टमनशी संपर्क साधावा. ’’

loading image
go to top