Harshwardhan Patil : नरेंद्र मोदी यांचे नेतृत्‍व अजित पवार यांना उशिरा मान्य झाले

नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व हे आम्हाला मान्य झाले म्हणून आम्ही २०१९ ला भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. अजित पवार यांना ते उशिरा मान्य झाले.
Harshvardhan Patil
Harshvardhan Patilsakal

पिंपरी - नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व हे आम्हाला मान्य झाले म्हणून आम्ही २०१९ ला भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. अजित पवार यांना ते उशिरा मान्य झाले. त्यामुळे जे जे कोणी महायुतीमध्ये येतील त्यांचे स्वागत आहे. पण; ते आल्यामुळे कोणतीही अडचण नाही, असे मत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बुधवारी (ता. ७) पत्रकारांशी बोलताना मांडले.

अजित पवार यांनी महायुतीमध्ये प्रवेश केल्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत इंदापूर विधानसभा मतदारसंघाची जागा कोणाकडे जाणार यावर सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. याविषयी पत्रकारांनी विचारले असता पाटील म्हणाले, ‘जागावाटपाचा निर्णय हा सर्वस्वी वरिष्ठांचा असेल.’

‘लोकसभेच्या संदर्भातील सगळे निर्णय राष्ट्रीय स्तरावर होतात. महायुतीतील ४८ जागांपैकी प्रत्येक पक्षाला किती जागा द्यायच्या यावर राज्यातले व राष्ट्रीय स्तरावरील नेते बसून निर्णय घेतील. सध्या प्रत्येक विधानसभा व लोकसभा मतदार संघाचा अभ्यास सुरु आहे. जागावाटप झाल्यानंतरच उमेदवाराची निवडून येण्याची क्षमता लक्षात घेऊन कोणत्या जागी कोणता उमेदवार द्यायचा हा निर्णय होईल. असे त्यांनी सांगितले.

अजित पवार गटाला चिन्ह देण्याचे हर्षवर्धन पाटील यांनी केले स्वागत

राष्ट्रवादी पक्षाचे नाव व चिन्ह हे अजित पवार गटाला देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत याचा आम्हाला फायदाच होईल. नरेंद्र मोदी यांची तिसऱ्या वेळी पंतप्रधान म्हणून निवड होईल.’, असा आत्मविश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com