
तळेगाव दाभाडे : ‘‘मावळ तालुक्यातील लोणावळा उपजिल्हा रुग्णालयांचे काम गतीने पूर्ण करावेत. यासोबत जांभूळ येथील क्रीडा संकुल सर्व सुविधांयुक्त आणि तालुक्याचा गौरव वाढविणारे असावे. कार्ला येथे ‘रोपवे’ उभारण्यासह श्री एकवीरा मंदिर परिसरातील विकासकामे तातडीने पूर्ण करावीत,’’ असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले.