Rohit Pawar : अजित पवार यांची राजकीय कारकिर्द संपविण्याचा प्रयत्न

माजी पोलीस आयुक्त मिरा बोरवणकर यांनी काढलेले येरवड्यातील जमीनीचे प्रकरण आत्ताच आचानक कसे पुढे आले. त्यावर एवढी चर्चा का होतेय. कुठेतरी अशी शंका वाटू लागली.
Rohit Pawar
Rohit Pawarsakal

पिंपरी - माजी पोलीस आयुक्त मिरा बोरवणकर यांनी काढलेले येरवड्यातील जमीनीचे प्रकरण आत्ताच आचानक कसे पुढे आले. त्यावर एवढी चर्चा का होतेय. कुठेतरी अशी शंका वाटू लागली की असे अनेक मुद्दे काढून लोकनेत्यांना ज्या पध्दतीने भाजपा संपविते तसे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राजकीय दष्ट्या संपविण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी (ता. १७) पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

राज्यातील तरुणांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी व आगामी नागपूर हिवाळी अधिवेशनात सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पुणे ते नागपूर युवा संघर्ष यात्रेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी ते बोलत होते.

यावेळी जेष्ठ नेते आझम पानसरे, पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे, माजी नगरसेविका सुलक्षणा शिलवंत -धर, शकुंतला भाट, जनाबाई जाधव, माजी नगरसेवक गणेश भोंडवे, युवक शहराध्यक्ष इम्रान शेख, महिला शहराध्यक्ष ज्योती निंबाळकर, प्रदेश प्रवक्ते रविकांत वर्पे, काशिनाथ नखाते, शहर प्रवक्ते माधव पाटील, ज्येष्ठ नेते शिरीष जाधव, देवेंद्र तायडे, प्रशांत कापसे आदी उपस्थित होते.

एका प्रश्‍नाला उत्तर देताना रोहित पवार म्हणाले की, राज्यात खासदार सुप्रिया सुळे लक्ष घालणारच पण पुणे शहरात खास लक्ष घालतील. जेथे कुठे माझ्या सारख्या कार्यकर्त्याची गरज लागेल तेथे मी राहणार. पुणे ते नागपूर युवा संघर्ष यात्रेला ३० सरपंचांनी पाठींबा दिला आहे. आझम पानसरे आमच्यासोबत आले आहेत.

केंद्राच्या दबाव तंत्राला घाबरुन तिकडे गेलेले अनेक राजकीय नेते भविष्यात आमच्याकडे आलेले दिसतील. इंडिया आघाडीने १५ ॲंकर, पत्रकारांवर बहिष्कार घातला. जर ते एकतर्फी बातमी देणार असतील व विरोधकांचे ऐकूनच घेणार नसतील तर दुसरा पर्याय त्यांच्यापुढे नव्हता.

बारामतीबाबत बावनकुळे बोलले त्याला अर्थ नाही

बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचा उमेदवार दिल्यास आम्ही त्याला निवडून आणू, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतेच केले होते. याबाबत विचारले असता आमदार रोहित पवार म्हणाले की, मी मध्यंतरी नागपूरला गेलो होतो.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सोडून अन्य कोणी उमेदवार दिल्यास ती भाजपची जागा येणार नाही, अशी चर्चा होती. अशा चर्चांना काही अर्थ नसतो. भाजपकडे उमेदवार नसल्याने कार्यकर्त्यांना उत्तेजन देण्यासाठी ते बोलले असावेत. सध्या सर्वाधिक अन्याय भाजपच्याच निष्ठावंत कार्यकर्त्यांवर होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com