

Dr Pratibha Lokhande sharing memories of Ajit Pawar from the 1991 Lok Sabha elections.
Sakal
-जयंत जाधव
पिंपरी : ‘सध्याच्या राजकारणात विरोधक म्हटले की एकदम टोकाची भूमिका घेतली जाते. परंतु; १९९१ मध्ये अजित पवार यांनी लोकसभेची पहिलीच निवडणूक लढविताना काटेवाडीत प्रचारादरम्यान मला घरी चहापानासाठी आमंत्रित केले होते. आमची गाठ पडली तेव्हा, ‘आपण प्रतिस्पर्धी भाजपच्या उमेदवार असलात तरी प्रचार होत राहिल, तुम्ही प्रथमच काटेवाडीत आला आहात,’ असे आपुलकीने म्हणत त्यांनी बोलावले होते. तेव्हा राजकारणात नवखे असूनही त्यांचा सुसंस्कृतपणा व पोक्तपणा भावणारा होता,’ अशी भावना डॉ. प्रतिभा लोखंडे यांनी व्यक्त केली.