esakal | Akurdi : विविधरंगी मखर वेधताहेत लक्ष
sakal

बोलून बातमी शोधा

pimpri chinchwad

Akurdi : विविधरंगी मखर वेधताहेत लक्ष

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

आकुर्डी : गणरायाच्या आगमनाची तयारी सर्वत्र मोठ्या जल्लोषाने सुरू आहे. बाजारपेठांमध्ये यंदा नवनवीन प्रकारचे मखर आलेले आहेत. गेल्या वर्षीच्या गणेशोत्सवापेक्षा यावर्षी मखर घेण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने येत आहेत. मखरांच्या किमतीमध्ये थोडाफार फरक जाणवतो आहे. शिवलिंग, वारीचा देखावा, राजमुद्रा, किल्ल्यांची प्रतिकृती, निसर्गसौंदर्य, फुलांनी सजलेले, मोर पिसारा, असे विविध प्रकारचे मखर बाजारात उपलब्ध आहेत.

यंदा विशेषतः वूडन, फोम आणि स्पंज प्रकारातील मखर बाजारपेठांमध्ये आहेत. दोनशे रुपयांपासून ते तीन हजार रुपयांपर्यंत मखरांच्या किमती आहेत. ग्राहकांचा कल वूडन आणि फोमकडे जास्त आहे. एक सप्टेंबरपासून बाजारपेठांमधील दुकानदारांनी वेगवेगळ्या प्रकारचे मखर अनेक ठिकाणांहून आणि कारखान्यांमधून मागविले आहेत. प्रत्येकामध्ये विविधता आहे.

हेही वाचा: Pimpri : स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय शिक्षकांचे आज प्रशिक्षण

गणपतीच्या उंचीनुसार, तर काही मखर हे नैसर्गिकरित्या बनवलेले आहेत. याशिवाय वेगवेगळ्या प्रकारचे कागद, रंगांपासून बनवलेले आहेत. मंदिराच्या आकाराची हुबेहूब प्रतिकृती असणारे मखरही विक्रीस उपलब्ध आहेत, याकडे ग्राहकांचा कल अधिक आहे. दरम्यान, कोरोनामुळे गेल्यावर्षी व्यवसाय फार झाला नसला, तरी यंदा दुकानात भरलेला माल संपण्यात आला आहे, असे काही व्यावसायिकांनी सांगितले.

इकोफ्रेंडली

थर्मोकोल आणि प्लास्टिक या पर्यावरणासाठी घातक गोष्टींऐवजी कागदापासून किंवा रद्दीपासूनसुद्धा सुंदर सजावट करता येते. कागद, काड्या, पेपर, कप, पुठ्ठा या वस्तूंपासून बनवलेले इको फ्रेंडली मखरही बाजारात आले आहेत.

हेही वाचा: पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण शंभर टक्के भरले

लाकडी अन् कापडी मखर

थर्माकोलवर बंदी असल्याने आता कापडी मखरांबरोबर लाकडी मखरही बाजारात आले आहेत. मागील वर्षी कापडी मखर अधिक प्रमाणात उपलब्ध होते. आता लाकडी प्लायवूड व त्यावर कापडी आवरण असलेले मखर आले आहेत. त्याचबरोबर लोखंडी स्टँड व त्यावर कापडी फुलांची सजावट असलेले मखरही आहेत. एक हजार ९०० ते १२ हजारांपर्यंत लाकडी मखर उपलब्ध आहेत.

मखर खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे. मात्र, सरकारच्या नियमांचे पालन करूनच आम्ही ग्राहकांना आतमध्ये सोडतो. यावर्षी ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद आहे. मध्यम आकाराचे मखर घेण्याचे प्रमाण जास्त आहे.

- जय वनवारी, मखर व्यावसायिक

loading image
go to top