आकुर्डी : अगोदर पैसे द्या, मगच कचरा नेणार

पालिकेच्या कर्मचाऱ्यांची मागणी; पुनावळे भागातील सोसायटीसमोर कचरा पडून
Pimpri-Chinchwad
Pimpri-Chinchwadsakal

आकुर्डी : रावेत (ravet) येथील पुनावळे भागात ‘द ट्वेन्टी होम्स’(सर्वे नंबर २/७) या भागात सोसायटीतील कचरा नेण्यासाठी कचरागाडीवरील कर्मचारी दरमहा ५०० रुपयांची मागणी करत आहेत. ५०० रुपये भरल्याशिवाय सोसायटीमधील कचरा हा घेऊन जाणार नाही, असे कर्मचारी म्हणत असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. 9Akurdi Pay first, then take the garbage )

कचरा घेऊन जाण्यासाठी गाडी नसल्याने तेथील नागरिकांना सोसायटीच्या समोर कचरा टाकावा लागत आहे. त्यामुळे सोसायटीमध्ये मोठ्या प्रमाणात आरोग्याच्या तक्रारी सुरू झाल्या आहेत. दुर्गंधीचे प्रमाणदेखील वाढले आहे. महापालिकेने या भागातील कचरागाडीच्या अडचणीकडे लक्ष घालून त्यावर तोडगा काढावा, असे स्थानिक रहिवाशांनी सांगितले.

रहिवासी म्हणतात...

गणेश सुतार (रहिवासी) : आमच्यासाठी एक रुपया देखील खूप महत्त्वाचा आहे. आम्ही आमचा घामाचा पैसा बेकायदेशीर होणाऱ्या मागणी पोटी पालिकेच्या कचरागाडी कर्मचाऱ्यांना का द्यावा?

सुरेश कोंडे (रहिवासी) : आज ते पाचशे रुपये मागत आहेत, असेच जर कायम देत राहिलो तर अजून काही दिवसांनी हीच रक्कम दुप्पटही होऊ शकते. मग आम्ही पैसेच भरत बसायचे का? यावर काहीतरी तोडगा निघणे अत्यंत आवश्यक आहे.

भावना वनवे-पाटील (रहिवासी) : अशा पद्धतीचा मागणी करणे अत्यंत बेकायदेशीर आहे. त्यामुळे महानगरपालिकेने यामध्ये लक्ष घालून यावर तोडगा काढावा.

अंकित वनवे पाटील (चेअरमन - ‘द ट्वेंन्टी होम्स’) पुनावळे : आमच्या सोसायटीमधील सर्व सभासद हे वेळच्या वेळेला पालिकेचे सर्व कर भरत आहोत. तरीदेखील महानगरपालिकेच्या कचरा गाडीवरील कर्मचारी आमच्याकडे पैसे मागतात. हे अत्यंत बेकायदेशीर आहे.

भीमसेन शिंदे (सुपरवायझर) : सध्या सुरू असलेल्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये लोकांकडे काम नाहीत. त्यातच सोसायटीतील अनेक लोक हे मध्यमवर्गीय आहेत. आम्ही हप्ते, भाडे भरायचे का?, कचरा गाडीच्या कर्मचाऱ्यांना बेकायदेशीर पैसे द्यायचे?

सतीश वडागळे (वॉचमन) ‘द ट्वेंन्टी होम्स’ सोसायटी, पुनावळे : कचरा गाडी मागील सोसायटीमध्ये (ज्यांनी पैसे भरले आहेत) त्या ठिकाणी एक एक तास थांबते, पण आमच्या सोसायटीत मात्र, थांबतही नाही. त्यामुळे सोसायटीतील नागरिकांना नाइलाजास्तव कचरा सोसायटीच्या समोर टाकावा लागतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com