पवना नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा; 2000 क्युसेकने पाणी सोडण्यात येणार

मावळ तालुक्यातील महत्वाचे पवना धरण ९६ टक्के भरले असून गुरुवारी दुपारपासून विद्युत निर्मितीद्वारे (हायड्रोद्वारे) १ हजार ४०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग पवना नदीपात्रात सोडण्यात आला आहे.
Pawana Dam water
Pawana Dam watersakal
Summary

मावळ तालुक्यातील महत्वाचे पवना धरण ९६ टक्के भरले असून गुरुवारी दुपारपासून विद्युत निर्मितीद्वारे (हायड्रोद्वारे) १ हजार ४०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग पवना नदीपात्रात सोडण्यात आला आहे.

Summary

वडगाव मावळ - मावळ तालुक्यातील महत्वाचे पवना धरण ९६ टक्के भरले असून गुरुवारी दुपारपासून विद्युत निर्मितीद्वारे (हायड्रोद्वारे) १ हजार ४०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग पवना नदीपात्रात सोडण्यात आला आहे. तसेच धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आणखी पाण्याचा येवा वाढल्यास रात्री दहा नंतर धरणाच्या सांडव्याद्वारे दोन हजार क्युसेकने पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती धरण प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

गेल्या चार दिवसांपासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे मावळ तालुक्यासह पिंपरी-चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणारे तालुक्यातील महत्वाचे पवना धरण ९६ टक्के भरले आहे. धरण परिसरात गुरुवारी दिवसभरात ३६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून १ जून पासून १ हजार ९५५ मिलीमीटर पाऊस झाला आहे. धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढतच चालला असून पाणलोट क्षेत्रात पाण्याची वाढती आवक लक्षात घेऊन गुरुवारी दुपारपासून विद्युत निर्मिती केंद्राद्वारे १ हजार ४०० क्युसेक्स याप्रमाणे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला असल्याची माहिती पवना पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता अशोक शेटे यांनी दिली.

पवना नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचे वाढते प्रमाण व परिस्थितीनुसार धरणातून रात्री दहा नंतर दोन हजार क्युसेक्स या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे पवना नदीकाठच्या रहिवाशांनी सतर्कता बाळगावी. पवना धरणाच्या खालील बाजुस नदीकाठच्या सर्व गावातील नागरिकांनी दक्ष राहून नदी तीरावरील त्यांची जनावरे, माेटारी, अवजारे व इतर सामग्री त्वरीत सुरक्षित ठिकाणी हलवावी. जेणेकरून कुठलीही जिवित व वित्त हानी हाेणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहनही शेटे यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com