एमएनजीएलचे तिन्ही कार्यालय बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MNGL office

एमएनजीएलचे तिन्ही कार्यालय बंद

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल)चे (MNGL) शेकडो गॅस पाइपलाइनचे जोड आहेत. गॅसचे बिल भरणे, नवीन जोड घेणे, भरणा करणे, गॅस रिफिल करणे, बिलातील दुरुस्ती, पाइपलाइनची गळती याशिवाय अनेक कामांसाठी सेवा कार्यालयात धाव घ्यावी लागते. परंतु, सध्या शहरातील चिंचवड, चिखली व संत तुकारामनगर पिंपरीतील तीनही एमएनजीएल कार्यालये कोरोना काळापासून बंद आहेत. त्यामुळे नागरिकांना असुविधांचा सामना करावा लागत आहे.

हेही वाचा: पिंपरी-चिंचवड शहरात शुक्रवारी १७३ नवीन रुग्ण

तीस लाख लोकसंख्या असलेल्या शहरात एमएनजीएलचे कार्यालय नसणे म्हणजे ही आश्चर्यकारक बाब आहे. नागरिकांना काही दिवसांपासून हेलपाटे मारल्यानंतर लक्षात आले की, तीनही कार्यालये बंद झाली आहेत. मेट्रोपोलिटन कमर्शिअल कॉम्पलेक्स चिंचवड (०२०-६६३२६७००), चिंचवड मेगा स्टेशन सीएनजी, चिखली (०२०-६५१०७५८८), संत तुकारामनगर पीएमपीएल बस डेपो(०२०-२०२७०१००) या भागातील कार्यालये बंद आहेत. तसेच या ठिकाणचे संपर्क क्रमांकही बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे अधिकच अडचण निर्माण झाली आहे. तीनही कार्यालयाच्या जागी कार्यालय दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करण्याच्या सूचना लावण्यात आल्या आहेत.

कोरोनामुळे ही सर्व कार्यालय बंद ठेवल्याचे नागरिकांना सांगण्यात आले. चिंचवडमधील कार्यालय नुकतेच बंद केल्याचे कस्टमर केअरने सांगितले. नागरिकांना विविध कामकाजासाठी थेट नरवीर तानाजी नगर, पीएमपीएल बस डेपो शिवाजीनगर या ठिकाणचे कार्यालय गाठावे लागत आहे. आपत्कालीन संपर्क क्रमांक केवळ अतीतातडीच्या गॅसच्या कामासाठी आहे. तर हेल्पलाइन क्रमांकावर कॉल केल्यास नागरिकांना प्रतिक्षा करण्याचाच अनुभव अनेक वेळा येत आहे. त्यामुळे नागरिक वैतागून जात आहेत.

हेही वाचा: ई-तिकीट मशिन ठरतेय डोकेदुखी

एमएनजीएलच्या आपत्कालीन क्रमांकावरील अधिकाऱ्यांसोबत संपर्क केला असता उत्तर दिले नाही. कस्टमर केअरशी संपर्क साधला असता कार्यालय बंद करण्यात आल्याचे सांगितले.

नागरिकांच्या ऑनलाइन तक्रारी :

मीना जाधव : ‘‘इमेलवर उत्तर मिळत नाही. संपर्क क्रमांक बंद आहेत. बिले भरूनही पुन्हा थकबाकीसह बिल आले आहे. गॅस अचानक बंद होतो आणि चार तासानंतर सुरू होतो.’’

झकेरिया शेख : ‘‘कॉल उठाये क्यू नहीं जाते’’

विन्सटन डिसूझा : ‘‘कित्येक दिवसांपासून बिल भरण्याचा प्रयत्न करत आहे. पण, होत नाही.’’

सागर रुईकर : ‘‘खूप वाईट अनुभव कस्टमर केअरचा आला आहे, आत्तापर्यंत जोड मिळाला नाही.’’

हेही वाचा: ‘माझ्या खुशीला शोधून द्या’, शोधणाऱ्यास ३ हजारांचे बक्षीस

नागरिक गर्दीत ताटकळत उभे

अनेकदा आपत्कालीन मोबाईल क्रमांक लागत नाही. त्याचबरोबर पाइपलाइन तुटल्यास लवकर कस्टमर केअर व आपत्कालीन क्रमांकावर उत्तर मिळत नाही. नवीन गॅस जोडणी घेण्यातही अनेक अडचणी येतात. गॅस जोडणी देतानाही जोडणाराच अनेक अडचणी घरात निर्माण करत आहेत. केवळ पैसे वेळेवर घेतले जातात. पण, सुविधा मिळत नाही. नागरिकांना अतिशय वाईट सेवा दिली जात आहे. अनेकदा गॅस जोडणीच बंद पडल्यावर नागरिकांचे खाण्यापिण्याचाच खोळंबा होत आहे. वेळेवर नागरिकांना बिले मिळत नाहीत. डिजिटल पेमेंट स्वीकारले जात नाही. नागरिकांना कामधंदा सोडून कार्यालयातील गर्दीत ताटकळत उभे राहावे लागत आहे.

Web Title: All Three Mngl Offices Closed

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :PCMCMNGL
go to top