esakal | ...म्हणून मावळातील अंगणवाडी सेविका, मदतनीस असुरक्षित 
sakal

बोलून बातमी शोधा

...म्हणून मावळातील अंगणवाडी सेविका, मदतनीस असुरक्षित 
  • कोरोनाविरुद्धच्या लढ्यात गावोगावी सर्वेक्षण
  • पुरेशा साधनांअभावी सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर 

 

...म्हणून मावळातील अंगणवाडी सेविका, मदतनीस असुरक्षित 

sakal_logo
By
रामदास वाडेकर

कामशेत (ता. मावळ) : गाव पातळीवर काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीस जीव धोक्‍यात घालून कोरोनाच्या लढ्यात कर्तव्य बजावत आहे. असेच कर्तव्य बजावत असताना पिंपळखुंटे येथील अंगणवाडी सेविकेला जीव गमवावा लागला. त्यामुळे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस याच्या सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सध्या तालुक्‍यात सुमारे 576 सेविका आणि मदतनीस कोरोनाच्या लढ्यात भूमिका बजावत आहे. 

यंदाचा स्वातंत्र्यदिन विद्यार्थ्यांविनाच

अंगणवाडीतील दैनंदिन कामासह गावातील कोरोना सर्वेक्षणाची जबाबदारी या सेविका आणि मदतनीस यांच्यावर सरकारने सोपवली आहे. दररोज कुटुंबांना भेटी देऊन थंडी, ताप, खोकला घशात खवखव डोकेदुखी या आजाराची लक्षणे आढळून आलेल्या रुग्णांची माहिती आरोग्य विभाग व ग्रामपंचायतीला देण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. प्रत्येक दिवशी साधारणपणे तीस घरांना त्यांना भेटी द्याव्या लागतात. एखाद्या गावात कोरोनाचा रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्यावर पन्नास कुटुंबाला भेटी देऊन त्याच्या नोंदी ठेवाव्या लागतात. सर्वेक्षण करणाऱ्या या महिलांच्या सुरक्षेसाठी गाव पातळीवर ग्रामपंचायतीने सुरक्षेची साधन पुरवणे आवश्‍यक आहे. मात्र, ग्रामपंचायती दुर्बल असल्याने त्यांना एक हॅण्डग्लोज देते, मास्क आणि सॅनिटाइझरची बाटली ऐवढेच सुरक्षा साहित्य घेऊन त्या काम करीत आहेत. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाच्या सर्वेक्षणाची आणि जनजागृतीची जबाबदारी पार पाडणाऱ्या या सेविका आणि मदतनीस असुरक्षित आहे. सुलोचना गराडे या सेविकेचा गुरुवारी 13 ऑगस्ट रोजी मृत्यू झाला. त्यांना तापाची लक्षणे आढळून आल्यावर उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले होते. पुढील तपासणी दरम्यान त्याचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सर्वेक्षण काळात कोरोनाची लागण झाल्यावर सेविका किंवा मदतनीस यांचा मृत्यू झाल्यास सरकारने विमा संरक्षण देणे अपेक्षित आहे. संघटना म्हणून या प्रकरणाचा पाठपुरावा करू. परंतु सर्व प्रकारची सुरक्षा घेऊन अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी काम केले पाहिजे. ग्रामपंचायतीने सुरक्षेची साधने नियमितपणे उपलब्ध करून द्यावी.
- अनिता कुटे,  तालुकाध्यक्ष, अंगणवाडी सेविका संघटना 

प्रत्येक सेविका आणि मदतनीस यांनी सुरक्षितपणे काम करावे, अशा सूचना दिल्या आहेत. ग्रामपंचायतीने सुरक्षेची साधन दिली पाहिजे. गराडे यांच्या मृत्यूमुळे सुरक्षेचा प्रश्‍न आला आहे. संबंधित सेविकेला विमा संरक्षणाचा लाभ मिळावा, यासाठी वरिष्ठ कार्यालयास प्रस्ताव सादर करण्यात येईल.
- मुकुल वासनिक, बालविकास प्रकल्प अधिकारी  

 
 

loading image