esakal | कलादिग्दर्शक राजेश साप्ते आत्महत्येप्रकरणी आणखी एक अटक
sakal

बोलून बातमी शोधा

Raju Sapte

कलादिग्दर्शक राजेश साप्ते आत्महत्येप्रकरणी आणखी एक अटक

sakal_logo
By
टीम ई सकाळ

पिंपरी : कलादिग्दर्शक राजेश मारुती साप्ते (Art Director Rajesh Sapte) यांच्या आत्महत्येप्रकरणी वाकड पोलिसांनी (wakad Police) आणखी एकाला अटक केली आहे. राकेश सत्यनारायण मौर्य (वय ४७, रा. लोखंडवाला, कांदिवली ईस्ट, मुंबई) असे आरोपीचे नाव आहे. यापूर्वी, चंदन रामकृष्ण ठाकरे, नरेश विश्वकर्मा (मिस्त्री), दीपक खरात यांना अटक केलेली आहे. तर गंगेश्‍वर श्रीवास्तव (संजूभाई), अशोक दुबे यांच्यासह इतर आरोपी फरारी आहेत. (another arrest art director Rajesh Sapte suicide case)

हेही वाचा: पिंपरी : बारा वर्षीय मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

मौर्य हा फिल्म स्टुडिओज सेटिंग ॲण्ड अलाईड मजदूर युनियनचा खजिनदार आहे. नरेश, गंगेश्‍वर, राकेश व अशोक यांनी कट करून साप्ते यांना जिवे मारण्याची, लेबर लोकांना कामावर येऊ न देण्याची तसेच, व्यावसायिक नुकसान करण्याची वारंवार धमकी दिली. याशिवाय दहा लाख रुपये व प्रत्येक प्रोजेक्टमध्ये एक लाखांची मागणी केली. साप्ते यांना अडीच लाख जबरदस्तीने देण्यास भाग पाडले.

हेही वाचा: घरात घुसून टोळक्‍याकडून कोंढवे धावडेत महिलेस जबर मारहाण

तसेच, त्यांचे बिझनेस पार्टनर ठाकरे याने ही वेळोवेळी विश्‍वासघात व फसवणूक करून त्यांचे आर्थिक नुकसान केले. आरोपींच्या या जाचाला कंटाळून साप्ते यांनी ताथवडे तील राहत्या घरात दोरी व टॉवेलच्या साहाय्याने ३ जुलैला गळफास घेऊन आत्महत्या केली. वाकड पोलिस इतर आरोपींचा शोध घेत आहेत.

loading image