सलग दुसऱ्या दिवशी चिखली जाधववाडीत अतिक्रमण विरोधी कारवाईचा हातोडा

 Anti-encroachment action in Jadhavwadi Chikhali
Anti-encroachment action in Jadhavwadi Chikhali

पुणे : मोशी 'क' क्षेत्रीय कार्यालय मौजे चिखली ( प्रभाग क्र 2 ) जाधववाडी , कुदळवाडी भागातील 18 मीटर देवराई डीपी रस्त्यालगतच्या अनधिकृत एक लाखाहून अधिक क्षेत्रफळावर केलेल्या पत्राशेड व बांधकाम आदी अतिक्रमणावर बुधवारी (ता. 3) कारवाईचा हातोडा मारला.
 
हीच कारवाई गुरुवारी (ता. 4) सलग दुसऱ्या दिवशीही करण्यात आली. महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनाधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने कारवाई केली सदर कारवाईमध्ये कुदळवाडी मधील गट नंबर 256, 257, 258, 259 येथील एकूण 70 अनधिकृत पत्राशेड असे एकूण क्षेत्रफळ अंदाजे 1 लाख 46 हजार चौरस फूट पाडण्यात आली आहेत. आज मात्र बुलडोझमुळे अधिकचे नुकसान होऊ नये म्हणून उरलेल्या पत्राशेड मालकांनी स्वतःहून ही पत्राशेड काढून घेत असल्याचे चित्र दिसून आले. येथील अतिक्रमण काढल्याने मोठ्या प्रमाणावरील भूखंड मोकळा दिसू लागला आहे. 

लक्षात ठेवा, वाहनांची तपासणी करण्याचा कुठलाही अधिकार पोलिसांना नाही ! 

ही कारवाई अतिरिक्त आयुक्त 2 अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, उपायुक्त मनोज लोणकर, सह शहर अभियंता मकरंद निकम. कार्यकारी अभियंता राजेंद्र राणे, उपअभियंता सूर्यकांत मोहिते , हेमंत देसाई, सुधीर मोरे, पोलीस उप अधिक्षक सुधीर हिरेमठ आदींच्या उपस्थितीत करण्यात आली. या कारवाईमुळे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. 


पिंपरी चिंचवड शहरात यापुढेही ठिकठिकाणी झालेल्या व्यापारी अनधिकृत पत्राशेडवर कारवाई करण्यात येणार असुन सदर पत्राशेड धारकांना पत्राशेड काढून घेण्याचे व होणारे नुकसान टाळण्याचे आवाहन केले आहे.
- अजित पवार, अतिरिक्त आयुक्त :  पिंपरी-चिंचवड महापालिका.

ही सर्व 70 हून अधिक पत्राशेड पाडल्यानंतर या ठिकाणी आढळलेले वीज वाहक वायरींचे जाळे, वीज व पाणी पाहता ही पत्राशेड अनधिकृत असूनही त्यांना वीज व पाणी पूरवठा कसा होत होता असा प्रश्न स्थानिक नागरिकांना पडला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com