पिंपरी : पर्यवेक्षक पदांच्या नियुक्त्या तात्काळ रद्द

महापालिकेत प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत शासन नियमानुसार सेवाज्येष्ठतेने नियमित पर्यवेक्षकांच्या रिक्त पदी नियुक्त्या होणे आवश्यक
Pimpri Chinchwad Municipal Corporation
Pimpri Chinchwad Municipal Corporationsakal

पिंपरी : महापालिकेत प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत प्रभारी पर्यवेक्षक पदांच्या नियुक्त्या तत्काळ रद्द करून शासन नियमानुसार सेवाज्येष्ठतेने नियमित पर्यवेक्षकांच्या नेमणुका करण्याची मागणी पदवीधर संघटनेचे अध्यक्ष मनोज मराठे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे आणि शिक्षण विभागाचे उपआयुक्त संदीप खोत यांच्याकडे लेखी निवेदन दिले आहे.

अध्यक्ष मराठे म्हणाले,‘‘ महापालिकेत प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत शासन नियमानुसार सेवाज्येष्ठतेने नियमित पर्यवेक्षकांच्या रिक्त पदी नियुक्त्या होणे आवश्यक आहे. परंतु तत्कालीन प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांनी सेवाज्येष्ठ नसलेले मर्जीतील ५शिक्षकांना चुकीच्या पद्धतीने प्रभारी पर्यवेक्षक पदी नेमणुका केल्या आहेत. त्यामुळे शिक्षण विभाग प्रशासनात नियमानुसार सेवाज्येष्ठ असलेले शिक्षक व मुख्याध्यापक यांची पदोन्नती रोखली गेली. त्यांची नियमित पर्यवेक्षक पदी नेमणूक न केल्यामुळे त्यांना सेवाज्येष्ठतेनुसार पर्यवेक्षक पदोन्नती मिळाली नाही."

Pimpri Chinchwad Municipal Corporation
टागोरांंच्या लंडनमधील घराची होणार विक्री; ममता बॅनर्जी खरेदीच्या तयारीत

"पर्यवेक्षकांना पूर्वी मिळत असलेल्या पदोन्नतीच्या वेतनवाढीपासून वंचित ठेवले आहे. शिंदे या शिक्षण विभागात तीन वर्षाहून अधिक कार्यकाळ कार्यरत होत्या, तरी त्यांनी ४ पर्यवेक्षक पदांची रोष्टर तपासणी पूर्ण केली नाही. प्रभारी पर्यवेक्षकांच्या नेमणुका रद्द करून नियमानुसार सेवाज्येष्ठतेने नियमित पर्यवेक्षकांच्या नेमणुका करण्याबाबत वेळोवेळी सूचना देऊनही आज अखेर या प्रभारी पर्यवेक्षकांच्या नेमणुका रद्द झालेल्या नाहीत. सेवाज्येष्ठ शिक्षक , मुख्याध्यापक यांच्या शासन नियमानुसार सेवाज्येष्ठतेने नेमणुका करून त्यांना पदोन्नतीची वेतनवाढ देऊन संबंधित प्रभारी पर्यवेक्षक पदी कार्यरत शिक्षकांच्या नेमणुका तत्काळ रद्द कराव्यात. ’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com