Aptitude Idol-2023 : विद्यार्थ्यांसाठीच्या 'अॅप्टिट्यूड आयडॉल-२०२३’स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aptitude Idol-2023 competition for students Tomorrow  deadline for registration

Aptitude Idol-2023 : विद्यार्थ्यांसाठीच्या 'अॅप्टिट्यूड आयडॉल-२०२३’स्पर्धा

पिंपरी : महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना रोजगारभिमुख बनविण्यासाठी, महाराष्ट्र असोसिएशन ऑफ ट्रेनिंग ॲन्ड प्लेसमेंट ऑफिसर्स (MaTPO) व महाराष्ट्र शासन तंत्रशिक्षण संचालनालय (DTE) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मा टी.पी.ओ. ॲप्टीट्यूड आयडॉल -२०२३’ या ऑनलाइन स्पर्धेचे आयोजन केले आहे.

विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी १० मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे. ११ मार्चला होणाऱ्या ऑनलाइन स्पर्धेसाठी राज्यभरातून ३०,०००विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. रोजगार निर्मिती करण्यासाठी विद्यार्थ्यांची तयारी करून घेणे व विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त प्लेसमेंट मिळवण्यासाठी उद्युक्त करणे हा या स्पर्धेमागील उद्देश आहे.

ही स्पर्धा निशुल्क आहे. पी.एच.एन. टेक्नॉलॉजी, ईबेक लँग्वेज लॅबोरेटरीज, एऑन-कोक्युबस्, ग्लोबल ड्रीम्झ, कँपस क्रिडेंशीअल, आय स्कूल कनेक्ट टेक्नॉलॉजीज, कोल्हापूर फाउंड्री अँड इंजिनीअरिंग क्लस्टर व इशरे-पुणे चॅप्टर हे या स्पर्धेचे प्रायोजक असल्याची माहिती महाराष्ट्र टी.पी.ओ. असोसिएशनचे अध्यक्ष प्रा. डॉ. शितलकुमार रवंदळे व डीटीईचे संचालक डॉ. विनोद मोहीतकर यांनी दिली आहे.

या स्पर्धेच्या आयोजनाकरिता महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयातील ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर्स, प्राचार्य व प्राध्यापकांचे सहकार्य मिळाले आहे. या स्पर्धेसाठी मा टी.पी.ओ.चे सेक्रेटरी डॉ. संजय जाधव, प्रा. संजय धायगुडे, प्रा. सुदर्शन सुतार, प्रा. दीपक पवार, प्रा. अमेय गौरवाडकर, प्रा. ऋषिकेश पांडे, प्रा. विजय टोपे यांचे सहकार्य लाभले आहे या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेक विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार मुदतवाढ दिली होती. नोंदणीची अंतिम मुदत १० मार्च २०२३ पर्यंत सकाळी दहापर्यंत वाढवण्यात आली आहे.

-कोण सहभागी होवू शकते

स्पर्धेत भाग घेण्यासाठी कोणतेही शुल्क नसून बी.ई. / बी.टेक / एम.ई. / एम.टेक. / डिप्लोमा / बीसीए / एमसीए / बीसीएस / एमसीएस / बीबीए / एमबीए / बी.एससी. / एम.एससी. / बी.फार्म. / एम.फार्म. व इतर कोर्सेसचे प्रथम वर्ष ते अंतिम वर्ष यातील सर्व विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. विजेत्या विद्यार्थ्यांना लॅपटॉप, मोबाईल, टॅब, स्मार्टवॉच, बॅग यासारखी पारितोषिके दिली जाणार आहेत.

येथे करा नोंदणी

नाव नोंदणी लिंक: या स्पर्धेत सहभागी होण्याकरिता विद्यार्थ्यांनी https://tinyurl.com/MaTPO-Aptitude-Idol-2023 यालिंक वरती ऑनलाईन नाव नोंदणी करावी.

याचे असणारे फायदे

कॅम्पस रिक्रूटमेंटमध्ये कंपन्यांकडून कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात याबद्दल विद्यार्थ्यांना एक्सपोजर मिळेल, ते आगाऊ तयारी करतील, महाराष्ट्रातील महाविद्यालयांची प्लेसमेंट टक्केवारी वाढेल.

टॅग्स :Pimpristudent