esakal | पिंपरी चिंचवडमधील या भागात सर्वाधिक पॉझिटीव्ह; तर या भागात आहे सर्वात कमी प्रमाण
sakal

बोलून बातमी शोधा

CoronaVirus

पिंपरी चिंचवड शहरातील सर्वाधिक 75 टक्के कोरोना पॉझिटीव्ह ऍन्टिबॉडीजचा सर्वोच्च दर पिंपळे निलख भागात आढळून आला. तर सर्वात कमी अवघा चार टक्के दर संभाजीनगर भागात आढळून आला. महापालिका आणि डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज ऍण्ड रिसर्च सेंटर यांनी केलेल्या पाच हजार नमुन्यांच्या अँटिबॉडीज सर्वेक्षणात ही बाब आढळून आली आहे.

पिंपरी चिंचवडमधील या भागात सर्वाधिक पॉझिटीव्ह; तर या भागात आहे सर्वात कमी प्रमाण

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी - शहरातील सर्वाधिक 75 टक्के कोरोना पॉझिटीव्ह ऍन्टिबॉडीजचा सर्वोच्च दर पिंपळे निलख भागात आढळून आला. तर सर्वात कमी अवघा चार टक्के दर संभाजीनगर भागात आढळून आला. महापालिका आणि डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज ऍण्ड रिसर्च सेंटर यांनी केलेल्या पाच हजार नमुन्यांच्या अँटिबॉडीज सर्वेक्षणात ही बाब आढळून आली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहरात कोरोनाचा संसर्ग किती झाला आहे, हे पाहण्यासाठी आणि किती लोकांमध्ये रोग प्रतिकार शक्ती निर्माण झाली आहे, यासाठी वेगवेगळ्या भागातील पाच हजार नागरिकांची "सार्स कोविड-2 आयजीजी' अँटीबॉडीज तपासणी सात ते 17 ऑक्‍टोबर या कालावधीत डॉ. डी. वाय. पाटील रिसर्च सेंटरच्या माध्यमातून करण्यात आली. यासाठी दहा पथकांची नियुक्ती करण्यात आली होती. सर्वेक्षणाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, 'गणेशोत्सव व अन्य सणांनंतर शहरात रुग्णसंख्या अधिक आढळून आली आहे. त्यामुळे दिवाळीनंतरही रुग्णवाढ निश्‍चित धरून नियोजन केले आहे. सध्या रुग्णसंख्या घटलेली दिसत आहे. परिणामी दिवाळीत अनेक लोक घराबाहेर पडण्याची शक्‍यता आहे.

Corona Updates : पिंपरी-चिंचवडमध्ये 113 नवीन रुग्ण

मात्र, नागरिकांनी बेफिकीर राहण्याऐवजी कोरोना अद्याप आहे, असे समजूनच स्वतः बरोबर इतरांचीही काळजी घ्यावी. 51 ते 65 वर्षांच्या नागरिकांमध्ये जास्त प्रमाणात अँटीबॉडीज आढळून आल्या आहेत. त्याचा दर 35.5 टक्के आहे. 12 ते 18 वयोगटातील मुलांमध्ये हे प्रमाण 34.9 टक्के आहे. सर्वसामान्य मृत्यू दर 0.18 टक्के आहे. बोपखेल, विनायकनगर, पवनानगर आदी भागातील पॉझिटीव्हचे प्रमाण 65 टक्के आढळले आहे.'' 

राज्याच्या आरोग्य विभागाचे पुणे विभाग मुख्य समन्वयक डॉ. सुभाष साळुंखे म्हणाले, 'हिवाळ्यात थंडीमुळे कोरोना रुग्णसंख्या वाढू शकते. त्यामुळे कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्‍यता आहे. त्यासाठी आता आहे, अशी सर्व यंत्रणा रुग्णालयांमध्ये ठेवली जाणार आहे. तुर्त नॉन कोविड रुग्णांसाठी यंत्रणेचा वापर केला जाणार आहे. कोरोनाची दुसरी लाट आली तरी, ती पहिल्या लाटेपेक्षा सौम्य स्वरुपाची असेल, असे सर्वेक्षणातून दिसून आले आहे.'' 

पिंपरी-चिंचवडच्या उपमहापौर पदासाठी राष्ट्रवादीकडूनही उमेदवार रिंगणात 

आढळेले पॉझिटीव्ह ऍन्टीबॉडीज प्रकार/टक्के 

  • सर्वसाधारण नागरिक/33.9 
  • झोपडपट्टी भाग/37.8 
  • गावठाणे, चाळी, दाट वस्ती/38.3 
  • गृहनिर्माण सोसायट्या/27.7 
  • महिलांमधील अँटीबॉडीज/33.8 
  • पुरुषांमधील अँटीबॉडीज/28.9 

वायसीएम 50 टक्के नॉन कोविड 
शहरातील कोरोना रुग्णांची संख्या सध्या कमी झालेली आहे. मात्र, हवामान बदलामुळे अन्य व्हायरल आजाराचे रुग्ण वाढत आहे. त्यांच्या मागणीनुसार मंगळवारपासून (ता. 3) महापालिकेचे वायसीएम रुग्णालय 50 टक्के क्षमतेने नॉन कोविड रुग्णांसाठी खुले केले जाणार आहे, अशी माहिती महापौर उषा ढोरे यांनी दिली. पक्षनेते नामदेव ढाके म्हणाले की, नेहरूनगर येथील जम्बो रुग्णालय, ऑटो क्‍लस्टर येथील रुग्णालय शंभर टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यात येणार आहे. आयुक्त हर्डीकर म्हणाले, 'शहरातील कोविड केअर सेंटरमधील तीन हजार बेड कधीही वापरू शकू अशी स्थिती आहे. तसेच, खाजगी रुग्णालयांनाही नॉन कोविड करण्याची परवानगी दिली आहे. गरज पडल्यास त्यांची पुन्हा मदत घेतली जाणार आहे. जम्बो रुग्णालयावर नियंत्रण ठेवण्यासाठी अतिरिक्त आयुक्तांच्या नियंत्रणाखाली कार्यकारी समिती नियुक्त केली आहे.'' वायसीएम रुग्णालयातील 50 टक्के नॉन कोविड केल्याने साधारणतः 350 बेड अन्य रुग्णांसाठी वापरता येणार आहेत.

Edited By - Prashant Patil