esakal | धक्कादायक ! वाढदिवसासाठी बिर्याणी न बनविल्याने धारदार हत्याराने वार 
sakal

बोलून बातमी शोधा

attack with a sharp knife for not making biryani for birthday in pimpri

संतोष प्रदीप गायकवाड (वय 40, रा. राजगृह हौसिंग सोसायटी, ओटास्कीम, निगडी) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी राजू केराप्पा गायकवाड (रा. आझाद चौक, संग्रामनगर, ओटास्कीम, निगडी) यांनी फिर्याद दिली आहे.

धक्कादायक ! वाढदिवसासाठी बिर्याणी न बनविल्याने धारदार हत्याराने वार 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी : दरवर्षीप्रमाणे वाढदिवस साजरा करण्यासाठी बिर्याणी न बनविल्याने एकाने धारदार हत्याराने केलेल्या हल्ल्यात वाढदिवस असलेली मुलगी गंभीर जखमी झाली. ही घटना निगडी येथे घडली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

संतोष प्रदीप गायकवाड (वय 40, रा. राजगृह हौसिंग सोसायटी, ओटास्कीम, निगडी) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी राजू केराप्पा गायकवाड (रा. आझाद चौक, संग्रामनगर, ओटास्कीम, निगडी) यांनी फिर्याद दिली आहे.

आरटीई २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी मुदतवाढ

फिर्यादीच्या मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गुरूवारी (ता.24) रात्री सव्वा नऊच्या सुमारास आरोपी याने फिर्यादीच्या कुटुंबाला फोन करून आपल्या घरी बोलाविले. दरम्यान, "दरवर्षी बिर्याणी बनवून वाढदिवस साजरा करता यावेळी का केला नाही' असे म्हणत फिर्यादीच्या पत्नीला शिवीगाळ करीत आरोपी त्यांना धारदार हत्याराने मारहाण करू लागला. त्यावेळी फिर्यादीच्या पत्नीला वाचविण्यासाठी त्यांची मुलगीमध्ये आली असता मुलीच्या हाताला गंभीर दुखापत झाली. याप्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून अधिक तपास सुरू आहे.

loading image
go to top