esakal | घरावर दगडफेक करून महिलेवर प्राणघातक हल्ला; चिंचवडमधील घटना
sakal

बोलून बातमी शोधा

घरावर दगडफेक करून महिलेवर प्राणघातक हल्ला; चिंचवडमधील घटना
  • जुन्या भांडणाच्या रागातून चौघांनी मिळून घरावर दगडफेक केली. त्यानंतर घरात शिरून घरातील साहित्याची तोडफोड करीत महिलेवर प्राणघातक हल्ला केला.

घरावर दगडफेक करून महिलेवर प्राणघातक हल्ला; चिंचवडमधील घटना

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी : जुन्या भांडणाच्या रागातून चौघांनी मिळून घरावर दगडफेक केली. त्यानंतर घरात शिरून घरातील साहित्याची तोडफोड करीत महिलेवर प्राणघातक हल्ला केला. ही घटना चिंचवड येथे घडली. 

धक्कादायक : पिंपरीत बांधकाम सुरू असताना कोसळला स्लॅब

संतोष पवार (वय 42), सागर राऊत (वय 30), सागर कोकरे (वय 29), सूरज राऊत (वय 25, सर्व रा. कुंभारगल्ली, दत्तनगर, चिंचवड) या आरोपींवर गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी आनंद ऊर्फ बालाजी भाऊराव दिवटे (वय 40, रा. रामनगर, कुंभारगल्ली, दत्तनगर, चिंचवड) यांनी फिर्याद दिली. फिर्यादी यांच्या पत्नी मीना दिवटे (वय 35) या गंभीर जखमी झाल्या आहेत. जुन्या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी फिर्यादीच्या घरावर दगडफेक केली. 

पिंपरी-चिंचवडमधील उद्योजकांना वीजबिलांचा शॉक; करोडो रुपयांची बिले थकीत 

सागर राऊत व सागर कोकरे यांनी घरात घुसून फिर्यादीस शिवीगाळ करीत घरातील साहित्याची तोडफोड करून फिर्यादीच्या पायावर चाकूने वार केला. तसेच, आरोपी सागर राऊत याने फिर्यादी यांची पत्नी मीना दिवटे यांचे केस पकडले. तर सागर कोकरे याने 'आज तुला जिवंत सोडत नाही' असे म्हणत मीना यांच्या पोटात चाकूने वार करीत प्राणघातक हल्ला केला. पिंपरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.