esakal | धक्कादायक : पिंपरीत बांधकाम सुरू असताना कोसळला स्लॅब
sakal

बोलून बातमी शोधा

धक्कादायक : पिंपरीत बांधकाम सुरू असताना कोसळला स्लॅब
  • चैताली सोसायटीत गेल्या महिन्यापासून हे काम सुरू असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

धक्कादायक : पिंपरीत बांधकाम सुरू असताना कोसळला स्लॅब

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी : मासुळकर कॉलनीतील चैताली सोसायटीमध्ये (एम सेक्‍टर) वाढीव बांधकाम सुरू होते. इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील प्लास्टरचा काही भाग शुक्रवारी (ता. 20) दुपारी अचानक कोसळला. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. 

पिंपरी-चिंचवडमधील उद्योजकांना वीजबिलांचा शॉक; करोडो रुपयांची बिले थकीत 

चैताली सोसायटीत गेल्या महिन्यापासून हे काम सुरू असल्याचे स्थानिकांनी सांगितले. महापालिकेच्या परवागनीविनाचा वनरूम किचन असलेल्या या घराला अतिरिक्त दोन मजले वाढविण्यात येत आहेत. हे बांधकाम बीमवर न करता कॅंटिलिवर स्लॅब करण्यात येत आहे. शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास बांधकामातील पहिला मजल्यावर जिन्याच्या बाजूचा स्लॅब कोसळला. दुपारची वेळ असल्याने कामगार जेवायला गेले होते. त्यामुळे जीवितहानी टळली. या बांधकाम करणाऱ्यांनी आजूबाजूलाही खड्डे खोदून ठेवले आहेत. त्यामुळे बांधकामाची व्याप्ती अजून वाढण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, या बांधकामामुळे सोसायटीमधील पार्किंगची जागा गायब होत चालल्याचे एका सोसायटीधारकाने सांगितले. 

पिंपरीत  पोलिस निरीक्षकांच्या अवघ्या सात दिवसांत पुन्हा बदल्या 

सोसायटीत अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. पहिल्यापासून कोणी विरोध न केल्यामुळे प्रत्येक जण आपापल्या जबाबदारीवर बांधकाम करत आहेत. 
- धनंजय जोशी, चेअरमन, चैताली सोसायटी 

घटनास्थळी बीट निरीक्षकांना पाठविले आहे. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच, याविषयी पोलिसांत तक्रारदेखील दाखल केली जाईल. सध्या सुरू असलेले बांधकाम तत्काळ थांबविण्यात येतील. 
- राजेंद्र राणे, कार्यकारी अभियंता, अतिक्रमणविरोधी विभाग