कार अंगावर घालून जिवे मारण्याचा प्रयत्न; पिंपरीतील घटना, पोलिसात तक्रार दिल्याचा राग

सकाळ वृत्तसेवा
Monday, 12 October 2020

व्याजाने दिलेल्या पैशावरून झालेल्या मारहाणीबाबत पोलिसात तक्रार दिली, त्या रागातून एकाने पादचाऱ्याच्या अंगावर कार घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना पिंपरीगाव येथे घडली. 

पिंपरी : व्याजाने दिलेल्या पैशावरून झालेल्या मारहाणीबाबत पोलिसात तक्रार दिली, त्या रागातून एकाने पादचाऱ्याच्या अंगावर कार घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना पिंपरीगाव येथे घडली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

सतेश एकनाथ नाणेकर (रा. महालक्ष्मी मंदिरासमोर, पिंपरीगाव) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी तानाजी एकनाथ थोरात (रा. सुंदरम बिल्डिंग, नवमहाराष्ट्र शाळेमागे, पिंपरीगाव) यांनी फिर्याद दिली. फिर्यादीने आरोपीकडून व्याजाने तीस हजार रुपये घेतले होते. या पैशाच्या कारणावरून आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ करीत लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली होती. तसेच, फिर्यादीच्या पत्नीला अश्‍लील बोलला होता. त्यामुळे फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून पिंपरी पोलिस ठाण्यात आरोपीवर गुन्हा दाखल झालेला आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये गुरुवारी कोणत्या भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार, वाचा

मारहाणीबाबत पोलिसात तक्रार दिल्याचा राग आरोपी नाणेकर याच्या डोक्‍यात होता. दरम्यान, फिर्यादी कामाला जाण्यासाठी नवमहाराष्ट्र शाळेसमोरील रस्त्याने पायी जात असताना आरोपीने त्यांच्या अंगावर कार घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. यामध्ये फिर्यादी गंभीर जखमी झाले. पिंपरी पोलिस अधिक तपास करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: attempt to kill by putting car at Pimpri