Video : चिमुकल्यांना व्हॉट्सअप ग्रुपवर आजोबा सांगतायत गोष्ट; रोज एक मस्त स्टोरी

Video : चिमुकल्यांना व्हॉट्सअप ग्रुपवर आजोबा सांगतायत गोष्ट; रोज एक मस्त स्टोरी

पिंपरी : 'आजोबा आजोबा आम्हाला गोष्ट सांगा ना!..' असा चिमुकल्यांचा आवाज काही वर्षांपूर्वी घराघरात ऐकायला मिळायचा. पण, काळ बदलला. माणसे बदलली. आजी-आजोबांच्या तोंडची गोष्टही गेली. मात्र, पुण्यातील एक साहित्यिक आजोबा बबन पोतदार यांनी लॉकडाउनचा पुरेपूर उपयोग करीत व्हॉटस्‌ऍप समूहाच्या माध्यमातून घराघरात गोष्ट पोचविण्याचा उपक्रम सुरू केला. त्यांच्या 'कथा प्रेमी' समूहात राज्यासह बेळगाव, दिल्ली येथील मराठी कथाकार, रसिकही सहभागी झाले आहेत. 

समूहावर सोमवारी (ता. 22) उपक्रमातील 74 वी कथा प्रसिद्ध केली. दररोज एकच कथा प्रसिद्ध केली जात असल्याने दिवसभर कथा लेखन, मांडणी यावरच चर्चा होते. एक प्रकारे ती समीक्षाच असते. या उपक्रमामुळे कथाकारांचा परिचय होतोय. कथा प्रसिद्ध करण्यापूर्वी तिच्याविषयी पोतदार भाष्य करतात. कथा निर्मितीमागचे बीज काय या विषयी स्वतः कथाकार सांगतो आणि कथा वाचायला मिळते. यामुळे नवोदिताना कथा लेखानाबाबत मार्गदर्शन मिळतंय. 23 मार्चपासून हा उपक्रम सुरू आहे. 

असे असते भाष्य... 

सोमवारच्या कथेविषयी बबन पोतदार भाष्य करतात, पती हाच परमेश्‍वर अशी पत्नीची भावना असते. याच धाग्याने लेखिकेने 'राम तेरी गंगा मैली' कथेचा विषय अतिशय चपखलतेने शब्दबद्ध करून गुंफला आहे. 

कथेमागची कथा... 

लेखिका डॉ. राजश्री पाटील सांगतात, माझ्या घरी काम करणाऱ्या गंगेसारख्या निर्मळ स्त्रीमध्येच मला कथा भेटली. वाट्याला आलेलं आयुष्य निमूटपणे सहन करणारी, पारंपरिक भारतीय स्त्री तिच्यात दिसली व शब्दबद्ध केली. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वाचकाच्या मते...

मी लेखक नाही, वाचक आहे. समूहावरील सकारात्मक कथांमुळे मनाला उभारी येते. कारण, वाचक कथा वाचत नसतो, तर जगत असतो. त्याला बोध हवा असतो. कथेतील विचार लगेच विसरले जात नाहीत, अनेक दिवस मनात असतात. मी थेट लेखकाशी बोलतो. रोजच्या कथांचे वाचन ज्येष्ठ नागरिक संघ व इतरांपर्यंत व्हॉटस्‌ऍपद्वारे पोचवितो. आमच्या पेट्रोल पंपावरील कर्मचारी व घरातील मंडळी, नातवंडांसमोर कथेचे वाचन केले जाते, असे कोपर्डे हवेली (ता. कराड, जि. सातारा) येथील बाजीराव चव्हाण या रसिकांनी सांगितले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

लेखिकेच्या मते...

नवोदितांना मार्गदर्शन मिळत आहे. नवे-जुने लेखक समूहावर एकत्र आले आहेत. ग्रामीण भागातील जीवनासह शहरी जीवन कथांमधून उमटते आहे. कथेवरून लेखक, समाज व प्रतिक्रियांवरून वाचकांची मानसिकता कळते. विचारांची देवाण-घेवाण होत आहे. वाचन संस्कृतीबाबत सकारात्मक बाजू दिसते आहे, असे दिल्लीतील ज्येष्ठ लेखिका लक्ष्मीकमल गेडाम यांनी सांगितले. 

मातृभाषेवरचे प्रेम वृद्धिंगत करावे, नव्या पिढीला साहित्याची विशेषत: मराठी साहित्याची आवड निर्माण व्हावी, यासाठी नव्या माध्यमांचा वापर करतो आहे. नवोदितांमधून दमदार लेखन करणारे साहित्यिक निर्माण व्हावेत आणि माय मराठी भाषेचा प्रचार व प्रसार सातत्याने व्हावा, हा या उपक्रमामागील उद्देश आहे. 

- बबन पोतदार, ज्येष्ठ ग्रामीण कथाकार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com