आयात-निर्यात चलनातून फसवणूक;ऑनलाइन व्यवहार करा जपून

आयात-निर्यात चलनातून फसवणूक;ऑनलाइन व्यवहार करा जपून

पिंपरी - पिंपरीत काम करणाऱ्या एका अधिकाऱ्याला परदेशातून कॉल आला, "कंपनीचे ऑडिट सुरू आहे. चलनाच्या (इनव्हॉइस) रकमेसाठी तुम्हाला बॅंकेचे तपशील पुन्हा पाठवावे लागतील.' अधिकाऱ्याने संबंधित ई.-मेलवर बॅंकेचे तपशील क्षणांत पाठवले. काही कालावधीनंतर ई-मेल हॅक झाला. कंपनीच्या खात्यातून पैसेही वजा झाले. नंतर अधिकाऱ्याच्या लक्षात आले. ई-मेलवरून व्यवहारातील चलनाची रक्कम कंपनीच्या खात्यातून 60 लाख रुपये अल्पावधीत गायब झाले. असे पाच सायबर गुन्हे लॉकडाउन कालावधीपासून समोर आले आहेत. 

पिंपरी-चिंचवडमध्ये औद्योगिकीकरण मोठ्या प्रमाणावर होत असल्याने खरेदी-विक्रीचे देश-परदेशात व्यवहार होत आहेत. कच्चा मालही परदेशातून मोठ्या प्रमाणावर मागविला जातो. प्रक्रिया केलेल्या मालाचीही निर्यात होत आहे. बहुराष्ट्रीय कंपन्याही या ठिकाणी कार्यरत आहेत. अशावेळी भारताबाहेर जपान, चीन, इंग्लंड अशा वेगवेगळ्या देशांमध्ये संपर्क व्यवसायासाठी होतो. भारतीयांना बऱ्याचदा भाषेचीही अडचण निर्माण होते. त्यामुळे समोरील व्यक्ती जे काही सांगते त्यावर डोळे झाकून व्यवहारांवर विश्‍वास ठेवला जातो. संवादात स्पष्टता आली नसल्याने मागेल ती माहिती त्वरीत पुरविली जाते. सोशल मीडियावरुनही सायबर गुन्हेगाराने आधीच माहिती मिळविली असते. त्यामुळे, परदेशी कंपन्यांमधूनच कॉल आहे असे भासते. 

आउटलुक व थंडरबोर्ड यासारखे ई-मेल क्‍लायंट शक्‍यतो अशा गुन्ह्यांमध्ये वापरले जातात. खोटे ई मेल तयार केले जातात. यामध्ये एखादा डॉट किंवा अक्षरांचा बदल असतो. त्यामुळे तो सारखा वाटतो. यासाठी ई मेलचा वापर व इतर व्यवहार कंपनीच्या सर्व्हरवरवरुन करणे अपेक्षित आहे. एकच ई-मेल सर्वांनी वापरणे अयोग्य आहे. यामुळे ई मेलमधील डेटा यामुळे सुरक्षित राहत नाही. फसवणूक टाळण्यासाठी फॅक्‍स किंवा व्हॉटसऍप करून शहानिशा करणे गरजेचे आहे. कोणत्याही मोठ्या व्यवहारांसाठी डिजिटल सिग्नेचरचा वापर करणे गरजेचे आहे. करोडोंचे व्यवहार करताना डिजिटल सिग्नेचर शहरात वापरली जात नाही. व्यवहारातील परदेशी कंपन्यांकडूनही सिग्नेचर पडताळणी करुन पाहणे गरजेचे आहे. सिग्नेचरसाठी दहा ते बारा अधिकृत कंपन्या भारतात कार्यरत आहेत ज्या पुरवितात. व्यापार वर्ग व अधिकाऱ्यांनी अशा गोष्टींपासून साक्षर होणे गरजेचे आहे. 

अशी घ्या दक्षता 
- आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपन्यांनी संगणक यंत्रणा सक्षम करावी 
- बनावट ई-मेल बाबत काळजी घ्यावी 
- शक्‍यतो प्रत्यक्ष व्यवहार करावेत 
- ई-मेल फिल्टरिंग वापरावेत 
- फ्री ई-मेल सुविधा वापरू नये 
- एनआयणी व व्हीएसएनएल यांचे आयडी वापरावेत 
- फायरवॉल सॉफ्टवेअरचा उपयोग करावा 
- सुरक्षेसाठी कंपन्या व व्यापारी वर्गाने वारंवार ऑडिट करावे 
- अँटिव्हायरसचा उपयोग वेळोवेळी करावा 

""ई मेलचा फूल हेडर माहिती असावा. खरा की खोटा ई मेल समजण्याचे तंत्र शिकावे. आर्थिक व्यवहार करणाऱ्यांना सायबर साक्षरता येणे गरजेचे आहे. त्यासाठी तांत्रिक बाबींची व बदलत्या अत्याधुनिक टेक्‍नॉलॉजीची वेळोवेळी माहिती ठेवणे अपेक्षित आहे. बॅंक खात्याची माहिती कोणालाही सांगणे चुकीचे आहे. प्रत्येक बनावट गोष्टी समजायला हव्यात. आरोपी मिळतात पण परदेशात असल्याने वेळ जातो यासाठी लेटर रोगेट्रीची कारवाई करावी लागते. सीबीआय, सीआयडी व दोन्ही देशांची परवानगी घ्यावी लागते. आरोपी हस्तातंरण करार यासाठी गरजेचा असतो. गुन्ह्यातील पैसे हे अनेक देशांच्या बॅंकात गेलेले असतात. परदेशी आर्थिक व्यवहारांमध्ये काळजी घेणे आवश्‍यक आहे.'' 
- संजय तुंगार, सायबर पोलिस निरीक्षक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com