कामावरून घरी जाताना तरुणाची अडवली गाडी अन्...

कामावरून घरी जाताना तरुणाची अडवली गाडी अन्...

कामशेत : कामावरून घरी जाताना रस्त्यात अडवून एकाला मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृष्णा श्रीपत बगाड (वय २३) रा. शिरदे ता. मावळ यांनी याप्रकरणी पोलिसात फिर्याद दिली आहे. ज्ञानेश्वर मधुकर कदम व सुनील सबाजी कदम दोन्ही रा. जांभवली ता मावळ यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरदे गावचे हद्दीत शिरदे फाट्यावर बगाड मोटार सायकल क्रमांक एमएच १४ जीटी ८८७४ घेऊन कामावरून घरी जात असताना, कदम यांनी बगाड याची गाडी अडवून त्याच्या तोंडावरील मास्क काढून तुला जास्त माज आला का, त्या दिवशी तू जास्तच बोलत होता. असे म्हणून त्यांनी रागाने चिडून जाऊन शिवीगाळ केली. लाकडी दांडक्याने बगाडला डाव्या भुवई जवळ, खांद्यावर डोक्याचे पाठीमागील बाजूस व पाठीवर मारहाण केली. ही घटना गुरूवार (ता.२) ला साडेसहा वाजता घडली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

फिर्यादी दवाखान्यात असल्याने तक्रार उशीरा दाखल करण्यात आली. पुढील तपास ठाणे अंमलदार वैभव सकपाळ करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com