Bhosari Crime : दहशत माजवण्यासाठी वाहनांची तोडफोड

रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या रिक्षा, कार, टेम्पो आदीं वाहनांचे दहशत माजवण्यासाठी तीन जणांनी मंगळवारी (ता. ४) पहाटे दोनच्या सुमारास तोडफोड केली.
vehicles damage
vehicles damagesakal

भोसरी - येथील दिघी रस्त्यावरील क्रांतीसुर्यनगरच्या रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या रिक्षा, कार, टेम्पो आदीं वाहनांचे दहशत माजवण्यासाठी तीन जणांनी मंगळवारी (ता. ४) पहाटे दोनच्या सुमारास तोडफोड केली. या अगोदरही दोन महिन्यापूर्वी असाच प्रकार येथे घडल्याचे काही नागरिकांनी सांगितले. वाहनांची तोडफोड करणाऱ्यांवर पोलिसांनी कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

या विषयी दिघी क्रांतीसूर्यनगर येथे राहणारे सोहेल लाल पठाण यांनी विन्या चव्हाण आणि त्याचे दोन साथीदार (पूर्ण नाव, पत्ता माहित नाही.) यांच्या विरोधात भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या विषयी भोसरी पोलिस ठाण्याचे वरिष्ट पोलिस निरीक्षक भास्कर जाधव यांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी हे नॅनो कारने कामावरुन घराजवळ आले असता विन्या चव्हाण व त्याचे इतर दोन साथीदार हे हातात लाकडी दांडके घेवून फिर्यादी यांच्या गल्लीतील गाडया फोडत होते. फिर्यादी तेथे गेल्यावर त्यांनी फिर्यादी यांच्या नॅनो कारची काच फोडली. धमकावून फिर्यादीचे बाराशे रुपये हिसकावून घेतले. त्यांनंतर त्यांनी गल्लीतील रस्त्यावर पार्क केलेल्या रिक्षा, कार व टेम्पो वाहनांची जाताना तोडफोड करत परिसरात दहशत पसरवली.

यामध्ये शंकर जाधव, शब्बीर शेख, सोहेल पठाण, कैलास जाधव, गोपाळ सावंत आदींसह इतर नऊ नागरिकांच्या वाहनांची तोडफोट झाली आहे. सकाळची वेळ असल्याने काचा तुटलेल्या असतानाही नुकसान टाळण्यासाठी काही टेम्पो चालाकांनी कामावर जाणे पसंत केल्याचे नागरिक सांगतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com