पावसामुळे भोसरी, दिघी, इंद्रायणीनगर परिसरातील जनजीवन विस्कळीत

सलग चार दिवस बरसणाऱ्या पाऊसधारांनी भोसरी, इंद्रायणीनगर, दिघी परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
Rain Water on Pune-Nashik Highway
Rain Water on Pune-Nashik HighwaySakal
Summary

सलग चार दिवस बरसणाऱ्या पाऊसधारांनी भोसरी, इंद्रायणीनगर, दिघी परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

भोसरी - सलग चार दिवस बरसणाऱ्या पाऊसधारांनी भोसरी, इंद्रायणीनगर, दिघी परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्त्यावर जागोजागी साचलेल्या पाण्यामुळे वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे. बालाजीनगरातील काही घरात पावसाचे पाणी शिरले. पुणे-नाशिक महामार्गावर पांजरपोळजवळील रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

भोसरीतील पुणे-नाशिक महामार्गावर पांजरपोळजवळील रस्त्याच्या सखल भागात गुडघ्यापर्यंत पाणी साचले होते. या पाण्यातून मार्ग काढताना काही वाहने बंदही पडत होती. त्याचप्रमाणे या भागाकून संथ गतीने वाहने सुरू राहिल्याने सकाळी साडेदहापासून सुमारे अर्धा किलोमीटर लांबवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या रस्त्यावर सुमारे वीस मिनिटे अडकल्यााने शाळेत पोचण्यास उशीर झाल्याचे स्कूल बस चालक सचिन महाजन यांनी सांगितले. दुपारी साडेबाराच्या सुमारास महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी घटना स्थळी भेट दिली. रस्त्यावर डिवायडर तोडून पाण्याला मार्ग करून दिला. कार्यकारी अभियंते अनिल शिंदे यांनी येत्या दोन दिवसात ही समस्या सोडविली जाणार असल्याचे सांगितले.

भोसरीतील बालाजीनगरमधील नाल्यालगत असलेल्या वस्तीतील शाबूद वाघमारे, सुहास जाधवर, उज्वला राजगुरू, मोनिका पवार, जयश्री मस्के, तांबोळी आदींसह चाळीस नागरकांच्या घरांत पावसाचे पाणी शिरल्यााने नागरिकांची तारांबळ झाली. काहींच्या घरातील विद्युत उपकरणे जळाल्याने आर्थिक नुकसानही झाले.

भोसरी एमआयडीसीतील ब्लॅाक डब्ल्यू १६९मधील रस्त्यावर गुडघ्याापर्यंत पाणी साचल्याने वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे. दुचाकी बंद पडल्याच्या घटना घडल्या आहेत. गेल्या चार दिवसापासून या ठिकाणी पाणी साचल्याने लघुउद्योजकांची अडचण वाढली आहे.

गेल्या चार वर्षापासून पुणे-नाशिक महामार्गावर पांजरपोळजवळील रस्त्यावर पाणी साचत आहे. तीन वर्षापूर्वी येथील नाल्याचा सर्व्हे केला होता. मात्र महापालिकेने यावर कारवाई केली नाही. लांडगेनगरमधील जाणाऱ्या नाल्याचे स्वच्छता व काम न केल्यामुळे पाणी अडले जाते. महापालिका बीआरटीकडे बोट दाखविते, तर बीआरटी राष्ट्रीय महामार्ग मंडळाकडे बोट दाखवून टोलवा टोलावी केली जात आहे.

- अ‍ॅड. नितीन लांडगे, माजी नगरसेवक

येथे साचले पाणी

भोसरी

- चांदणी चौक, पीसीएमसी चौक, बापूजीबुवा चौक, महापालिकेची क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शाळा प्रवेशद्वार, दिघी रस्त्यवरील गंगोत्री पार्क, चक्रपाणीवसाहत रस्ता.

दिघी

- मॅगझीन चौक, छत्रपती संभाजी महाराज चौक ते विठ्ठल मंदिरापर्यंतचा रस्ता, आदर्शनगरातील सह्याद्री कॅालनी क्रमांक तीन.

इंद्रायणीनगर

- संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुलसमोरील रस्ता, संतनगर बस थांबा, पेठ क्रमांक सातमधील यशवंतराव चव्हाण चौक, बिझी संकूलसमोरील रस्ता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com