
भोसरीतील खंडोबामाळमध्ये राहणाऱ्या दहा नागरिकांचे अकरा पाण्याचे मीटर चोरट्यांनी रविवारी (ता. १३) चोरून नेले. यामध्ये निवृत्ती फुगे यांच्या दोन मीटरसह रविंद्र नांदूरकर, बंडू गटकळ, रामाभाऊ फुगे, सूरज फुगे, प्रकाश फुगे, दत्तात्रय फुगे, गणेश फुगे, चंद्रकांत फुगे, ज्ञानेश्वर घोलप आदींच्या पाण्याच्या मीटरचा समावेश आहे.
भोसरी(पिंपरी) : पाण्याचे मीटर चोरीस गेल्याने महापालिकेला रिडिंग घेता येणार नसल्याने महावितरणसारखे अंदाजपंचे पाण्याचे बील येण्याची भिती आहे. पाण्याचे मीटर पहाटे तीनच्या सुमारास चोरीस गेले आहेत. त्यामुळे पोलिसांनी पहाटेच्या सुमारास परिसरात गस्त वाढवून चोरांवर आळा बसविणे गरजेचे आहे अशी मागणी भोसरीतील खंडोबामाळमध्ये राहणारे रविंद्र नांदूरकर करत होते.
भोसरीतील खंडोबामाळमध्ये राहणाऱ्या दहा नागरिकांचे अकरा पाण्याचे मीटर चोरट्यांनी रविवारी (ता. १३) चोरून नेले. यामध्ये निवृत्ती फुगे यांच्या दोन मीटरसह रविंद्र नांदूरकर, बंडू गटकळ, रामाभाऊ फुगे, सूरज फुगे, प्रकाश फुगे, दत्तात्रय फुगे, गणेश फुगे, चंद्रकांत फुगे, ज्ञानेश्वर घोलप आदींच्या पाण्याच्या मीटरचा समावेश आहे. एकाच वेळेस एवढ्या मोठ्या प्रमाणात नागरिकांचे पाण्याचे मीटर चोरीस गेल्याने खंडोबामाळमधील नागरिक चिंतेत आहेत.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
सध्या पाण्यासाठी पीयुसी पाइपचा उपयोग केला जातो. हे पाईप सहज कापले जातात त्याचप्रमाणे जड वस्तूच्या माऱ्याने सहज तोडता येतात. त्यामुळे चोरटे एकाच वेळेस इतक्या मोठ्या प्रमाणावर पाण्याचे मीटर चोरून नेऊ शकले. काही नागरिकांनी पाण्याचे मीटर पितळेचे बसविले होते. हे पितळ विकण्यासाठी चोरट्यांनी मीटर चोरून नेल्याची शक्यता आहे. बाजारामध्ये पाण्याचे मीटर अठराशे रुपयापासून पासून उपलब्ध आहे. त्यामुळे नागरिकांना नवीन मीटर बसविण्याचा खर्च सोसावा लागणार आहे.
दिवसाआड पाणी येत असल्याने रविवारी (ता. १३) खंडोबामाळमध्ये पाणी आले नव्हते. त्यामुळे रविवारी मीटर चोरीस गेल्याचे लक्षात आले नाही. सोमवारी( ता. १४) पाणी आले. मात्र, नळाला पाणी येत नव्हते. तेव्हा पाहणी केल्यावर मीटर चोरी लक्षात आली. सध्या तुटलेल्या ठिकाणी साधा पाइप जोडून पाणी भरले. महापालिकेकडे वीज मीटर चोरीचा अर्ज दिला आहे. मीटर बसविण्यासाठीचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. चोरट्यांवर पोलिसांद्वारे कारवाई होण्याची गरज आहे.
-निवृत्ती फुगे, नागरिक
अवयवदानाची चळवळ "अनलॉक'च रुग्णांचे प्राण वाचविण्याबाबत वाढतेय जागृती
महापालिकेच्या इतर भागांमध्ये पाण्याच्या मीटर चोरीस जाण्याच्या तुरळक घटना घडल्या आहेत. मात्र मीटर चोरीस जाऊ नये यासाठी नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. चोरीस गेलेल्या पाण्याच्या मीटर धाराकांना नवीन मीटर बसविल्यानंतर येणाऱ्या पहिल्या महिन्याच्या बीलावरून अगोदरच्या महिन्याचे बील दिले जाईल. नागरिकांनी मीटर दुकानातून स्वतः आणून बसवून त्याच्या वैधतेचे प्रमाणपत्र महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडे जमा करणे गरजेचे आहे.
- अजय सूर्यंवंशी, कार्यकरी अभियंता, पाणी पुरवठा विभाग
ही काळजी घ्या
- पाण्याचे मीटर घराजवळ सुरक्षीत ठिकाणी बसवा.
- मीटरला लोखंडी पेटी बसवून कुलूपबंद ठेवा.
- मीटरजवळ पीयुसी पाईप न वापरता जीआय (लोखंडी) पाइप बसवा.
चोरी सीसीटिव्हीत कैद
निवृत्ती फुगे यांच्या घराजवळील पाण्याच्या मीटरची चोरी सीसीटिवी कमेऱ्यात कैद झाली आहे. यामध्ये पहाटे तीनच्या सुमारास एक जोडपे पाण्याचे मीटर पिशवीत घालून नेताना दिसत आहे. हे सीसीटिव्ही फुटेज पोलिसांना देण्यात येणार असल्याची माहिती फुगे यांनी दिली.