24 पिस्तूल, 38 जिवंत काडतुसे जप्त;मध्यप्रदेशातून पिस्तूल पुरविणारी टोळी जेरबंद

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 28 January 2021

गुन्हेगारी टोळीना पिस्तूल पुरविणाऱ्या टोळीला भोसरी पोलिसांनी जेरबंद केले आहे. पोलिसांनी मध्यप्रदेशमध्ये जाऊन एकूण 24 पिस्तूल व 38 जिवंत काडतुसे जप्त केली असून 12 सराईत गुन्हेगारांना अटक केली.

पिंपरी - गुन्हेगारी टोळीना पिस्तूल पुरविणाऱ्या टोळीला भोसरी पोलिसांनी जेरबंद केले आहे. पोलिसांनी मध्यप्रदेशमध्ये जाऊन एकूण 24 पिस्तूल व 38 जिवंत काडतुसे जप्त केली असून 12 सराईत गुन्हेगारांना अटक केली.

बबलूसिंग उर्फ रॉनी अत्तरसिंग बरनाला (रा. मध्यप्रदेश), कालू उर्फ सुशील मांगीलाल पावरा (रा. मध्यप्रदेश), रुपेश उर्फ संतोष सुरेश पाटील (धुळे), उमेश अरूण रायरीकर (बहुली, हवेली), बंटी उर्फ अक्षय राजू शेळके (मुंडवा), धीरज अनिल ढगारे (हडपसर), दत्ता उर्फ महाराज सोनबा मरगळे (पेरणे फाटा, दौड), मॅण्टि संजय बोथ उर्फ वाल्मिकी (पिंपरी), यश उर्फ बबलू मारुती दिसले (बोपखेल), अमित बाळासाहेब दगडे (बावधन), राहुल गुलाब वाल्हेकर (भोर) आणि संदीप आनंता भुंडे (बावधन) या गुन्हेगारांना अटक केली आहे.

पोलिस भोसरी परिसरात गस्त घालत असताना एका गुन्हेगाराची माहिती मिळाली. त्यानुसार रुपेश पाटील याला ताब्यात घेऊन 4 पिस्तूल व  4 काडतुसे जप्त केली. त्याच्याकडे कसून चौकशी करुन त्याचा पुढील तपास सुरु केला. त्यानुसार सहाय्यक निरीक्षक सिद्धेश्वर कैलासे आणि त्यांचे पथक मध्यप्रदेशात गेले. एका जगलात पिस्तूलचा मुख्य डीलर रॉनी याला ताब्यात घेतले.

विद्यार्थ्यांशिवाय शाळा; विद्यार्थी चार फेब्रुवारीपासून

भोसरी पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करुन सुमारे 12 लाख रुपये किंमतीचे 24 पिस्तूल आणि 38 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले आहेत. यामध्ये मुळशी पॅटर्न प्रमाणे गुन्हे करणारे गुन्हेगार नन्या उर्फ उमेश रायकर, राहुल वाल्हेकर, धीरज ढगारे यांनाही अटक करण्यात आलेली आहे. या गुन्हेगारावर यापूर्वी वेगवेगळ्या प्रकारच्या कारवाई करण्यात आलेल्या आहेत.

सोशल मीडिया आणि येरवडा कारागृहातील गुन्हेगारांशी संपर्क साधून मध्यप्रदेशमध्ये तयार झालेले पिस्तूल जळगाव मार्गे पुणे, पिंपरी चिंचवड शहरात पुरविली जात होती. भोसरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

गुन्हेगारी टोळी वाकडमध्ये जेरबंद 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bhosari police twelve criminals were arrested twenty-four pistols thirty-eight live cartridges seized