Jayant Patil : उद्याची लढाई सुज्ञ मतदारांच्या हाती; कोणाला निवडायचं हे मतदारांनी ठरवणे गरजेचे

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याद्वारे भोसरीत 'शिवपुत्र संभाजी' या महानाट्याचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी (ता. २५) महानाट्याच्या समारोपाच्या प्रयोगात जयंत पाटील बोलत होते.
Jayant Patil
Jayant Patilsakal

भोसरी - उद्याची लढाई ही जरा वेगळी आहे. एका बाजूने धनशक्ती आहे. विरोधक साधन संपत्ती समवेत तुमच्या प्रत्येकाच्या दारी येणार आहेत आणि दुसऱ्या बाजूने छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचा स्वाभिमान घेऊन डॉ. अमोल कोल्हे तुमच्या दारात येणार आहेत. तेव्हा कोणाला निवडायचं हे सुज्ञ मतदारांनी ठरवणे गरजेचे आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भोसरीत व्यक्त केले.

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याद्वारे भोसरीत 'शिवपुत्र संभाजी' या महानाट्याचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी (ता. २५) महानाट्याच्या समारोपाच्या प्रयोगात ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने यापूर्वीच डॉ. अमोल कोल्हे यांची शिरूर लोकसभेच्या उमेदवारीसाठी निवड केली आहे.

भोसरी विधानसभा मतदार संघातील मतदारांशी आणि श्रोत्यांशी 'शिवपुत्र संभाजी' या महानाट्याद्वारे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी संपर्क साधला. यावेळी जेष्ठ नगरसेवक वसंत लोंढे, पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे युवा शहराध्यक्ष इमरान शेख, माजी नगरसेवक प्रकाश सोमवंशी, सुनील गव्हाणे आदी उपस्थित होते.

पाटील पुढे म्हणाले, 'विचार आणि आचरण हे ज्यांचं एक असतं त्याला समाज नेहमी मान देत असतो. मान हा सहजासहजी हिसकावून मिळत नाही. मान हा हट्ट करून मिळत नाही. मान हा दगाबाजी करूनही मिळत नाही. मान हा सत्याने आणि तत्त्वनिष्ठेने मिळतो. तो डॉ. अमोल कोल्हे यांनी मिळवला आहे.'

पुन्हा तावडीत सापडणार नाहीत म्हणून…

शिवपुत्र संभाजी या महानाट्याच्या समारोपाच्या प्रयोगाला सुमारे तीस हजार श्रोत्यांनी हजेरी लावली होती. महानाट्याच्या मध्यंतरास प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील श्रोत्यांशी संवाद साधत होते. तेव्हा ते म्हणाले, 'उद्या निवडणूक असतील म्हणून मी प्रचार करतोय असा विचार मनात येऊ देऊ नका. एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही माझ्या तावडीत परत कधी सापडणार नाही. म्हणून मी आत्ताच संधी साधत आहे.' असे पाटील म्हणतात श्रोत्यामधून एकच हशा पिकला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com