Pimpri News : सायकलींमुळे आश्रमातील गरजू विद्यार्थ्यांच्या पायपीटीला ब्रेक

लक्ष्मण जगताप जयंती निमित्त कलाटे फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम
Bicycles for needy students in ashram Kalate Foundation on occasion of Laxman Jagtap Jayanti
Bicycles for needy students in ashram Kalate Foundation on occasion of Laxman Jagtap Jayanti sakal

वाकड : वापरात नसलेल्या जुन्या मात्र उत्तम स्थितीतील तसेच काहींची गरजेनुसार थोडीफार डागडुजी करून तबबल २० सायकलींची अनोखी भेट पौडच्या (मुळशी) दुर्गम भागातील वनवासी कल्याण आश्रमातील गरजू व अभ्यासू विद्यार्थ्यांना मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

आता त्यांची डोंगर खोऱ्यातील बिकट वाट सुकर झाली असून त्यांच्या शिक्षणाला गती प्राप्त झाली आहे. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या प्रथम जयंतीनिमित राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शाखा वाकड व रणजित आबा कलाटे फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.

रंजले-गांजलेले, दिन-दुबळ्यांना आपले म्हणा, त्यांना मदत करा, गरजूंच्या अडचणींना धावून जा! अशी लक्ष्मण जगताप यांची आपल्या कार्यकर्त्यांना कायम शिकवण असे ही शिकवण कलाटे फाऊंडेशनने सार्थ ठरवीत जगताप यांना समाजपयोगी कामातून अनोखी श्रद्धांजली वाहिली. त्यामुळे परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे.

वनवासी कल्याण आश्रमातील विद्यार्थी ऊन-वारा व मुसळधार पाऊसाचा सामना करत सुमारे चार-पाच किलोमीटर अंतरावरील शाळेत पायपीट करून जातात. कधी कधी त्यांना विलंब होत असल्याने शिक्षणात बाधा येते. शहरातील अनेक सोसायटींच्या पार्किंगमध्ये असंख्य सायकली धूळखात पडून असतात. कालांतराने त्या वापराविना खराब होतात अशा सायकली गरजूंच्या वापरता याव्यात यासाठी त्या देण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यास उत्तम प्रतिसाद लाभला.

सोसायटी रहिवाशांचे औदार्य

वाकड व कस्पटेवस्ती मधील विविध सोसायटी रहिवाशांनी औदार्य दाखवत त्यांच्या जवळील सुस्थितीतील केवळ वापरात नसलेल्या तर काहींनी किरकोळ नादुरुस्त सायकली स्वयंस्फुर्तीने रणजित आबा कलाटे फाऊंडेशनच्या कार्यालयाकडे जमा केल्या.

फाउंडेशनने त्या सायकलींची डागडुजी व दुरूस्ती करून वनवासी कल्याण आश्रमातील विद्यार्थ्यांना प्रदान केल्या. यावेळी रणजित आबा कलाटे फाऊंडेशनच्या अध्यक्षा स्नेहा कलाटे, रणजीत कलाटे, अक्षय वाघमोडे, रणजीत मानकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com