चला सायकल चालवूया; पिंपरी चिंचवडमध्ये फिटनेसचा नवा मंत्र

रमेश मोरे 
Wednesday, 30 September 2020

सायकलिंग आणि नेत्रदानासाठी लोकांना प्रेरणा मिळावी म्हणून सायक्लोथॉन २०२० चे यशस्वी आयोजन करण्यात आले.

जुनी सांगवी : पिंपरी चिंचवड सायकलिस्ट्स या नुकत्याच स्थापन झालेल्या ऑडॅक्स क्लब पॅरिस यांच्या अधिपत्याखाली जगभर चालू असलेल्या वेगवेगळ्या देशांमध्ये, भारतातील ऑडॅक्स इंडिया रँडॉनीअर च्या परवानगीने पिंपरी चिंचवड शहराला आंतरराष्ट्रीय स्तरावर घेऊन जाण्याच्या उद्देशाने चालू करण्यात आलेल्या क्लबच्या वतीने रविवारी सायकलिंग आणि नेत्रदानासाठी लोकांना प्रेरणा मिळावी म्हणून सायक्लोथॉन २०२० चे यशस्वी आयोजन करण्यात आले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, या कल्बची स्थापना झाल्यानंतरचा पहिलाच उपक्रम होता. कोरोनाच्या काळात अतिशय सूत्रबद्धरित्या त्याचे नियोजन करण्यात आले होते. सर्व परवानग्या व सुरक्षिततेची काळजी घेत ५० कीमी आणि १०० कीमी अशा २ गटात ही सायक्लोथाॅन घेण्यात आली. एका गटात चाळीस असे दोन गटात 80 स्पर्धकांना भाग घेतला. शंभर कीमी गटाची सुरुवात सकाळी ६ वाजता वाहतूक विभाग पोलीस निरीक्षक श्री मोहन जाधव तर पन्नास की.मी. गटाची सुरुवात ऑडॅक्स इंडिया च्या दिव्या ताटे यांच्या शुभहस्ते झेंडा दाखवून करण्यात आली.

सायक्लोथॉन चा मार्ग सावित्रीबाई फुले उद्यान वाकड,  बालेवाडी,  देहूरोड,  वडगांव,  कामशेत,  लोणावळा आणी परत सावित्रीबाई फुले उद्यान असा होता. प्रत्येक स्पर्धकाला स्पर्धा पूर्ण केल्यावर प्रमाणपत्र व स्न्मानचिन्ह देण्यात आले. या उपक्रमाचे आयोजन प्रसिद्ध सायकलिस्ट आणि नेत्ररोग तज्ञ डॉ बबन डोळस यांनी केले. 

लोकांना नेत्रदानासाठी प्रेरित करणे व लोकांमध्ये सायकलिंगची आवड निर्माण व्हावी याचबरोबर सायकल चालवून नागरीकांनी आरोग्य सदृढ करावे असे डॉ. बबन डोळस यांनी सांगितले. क्लबचे उत्कृष्ठ सायकलिस्ट व फिटनेस आयकॉन डॉ धनराज हेळंबे, डॉ. आदेश काळे, मयुर शानबाग, अंशुमन, सागर वाकडे, सिध्दगोंडा पाटील यांनी संयोजन केले. 

राजसाहेबांच्या भेटीने मनसैनिकांना दहा हत्तींचे बळ

सायकलस्वारीतून जनजीगृती-1)नेत्रदानासाठी सायकलस्वारीतून जनजीगृती
2)परिसरातील ऐंशी जणांचा उत्सफुर्त सहभाग
3)स्मार्ट सिटीकडे वाटचाल करताना सायकल प्रेमींना जोडण्याचे संघटन.
4)निरोगी स्वस्थ जिवनासाठी सायकल चालवणे फायदेशीर ही प्रतिमा जनमाणसात पोचवण्याचा उद्देश 
5)महामारी सारख्या संकटकाळा सर्व सुरक्षितता बाळगुन केले आयेजन.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Big participation of citizens in Cyclothon 2020