बर्थडे बॉयला वाढदिवस साजरा करणे पडले महागात 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 5 January 2021

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. त्यात एका तरुणाने गर्दी करुन त्याचा वाढदिवस साजरा केला. याबाबत बर्थडे बॉयसह आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपरी - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. त्यात एका तरुणाने गर्दी करुन त्याचा वाढदिवस साजरा केला. याबाबत बर्थडे बॉयसह आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नीलेश अरुण पवार (वय 20, रा. वैभव कॉलनी, विजयनगर, काळेवाडी) असे बर्थडे बॉयचे नाव आहे. त्याच्यासह ऋषिकेश भुजबळ, भूषण कुदळे (दोघे रा. पिंपरीगाव), अनिल भंडारी, आकिब खान, सूरज कदरापुरकर (तिघे रा. काळेवाडी), कृष्णा डोळे, आकाश भोसले (दोघे रा. रहाटणी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आरोपी नीलेश याचा 2 जानेवारीला वाढदिवस होता. त्याने त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या मित्रांना एकत्र बोलावले आणि शनिवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास वाढदिवस साजरा केला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरात रात्री अकरा ते पहाटे सहा यावेळेत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. या आदेशानुसार पाच किंवा पाच पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी आहे. मात्र, आरोपींनी या आदेशाचे उल्लंघन करून वाढदिवस साजरा केला. 

80 व्या वर्षी आजोबांची कमाल;टाकाऊ वस्तूंपासून बनवलं वॉटर सेव्हर

गल्लीत सुरु असलेल्या या वाढदिवसाबाबत स्थानिक नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कारवाई केली. वाकड पोलिस अधिक तपास करीत आहेत.

बदल्यांसाठी ऑनलाइन पोर्टल करणार;वर्षा गायकवाड यांचे आश्‍वासन

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Birthday Celebration Crime