esakal | पिंपरी-चिंचवड भाजप नगरसेविकाचं डेंग्यूमुळे निधन, परिसरात हळहळ
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरी-चिंचवड भाजप नगरसेविकाचं डेंग्यूमुळे निधन, परिसरात हळहळ

पिंपरी-चिंचवड भाजप नगरसेविकाचं डेंग्यूमुळे निधन, परिसरात हळहळ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - थेरगाव येथील भाजप नगरसेविका अर्चना तानाजी बारणे (वय ३९) यांचे मंगळवारी (ता. १३) डेंगी आजारामुळे निधन झाले. यापूर्वी कोरोनामुळे तीन नगरसेवकांचे निधन झाले आहे. त्यामुळे सभागृहातील संख्याबळ १२४ झाले आहे.

महापालिका ‘प्रभाग २३ ब’चे प्रतिनिधित्व बारणे करत होत्या. चार दिवसांपासून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या मागे सासू, पती, दीर, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयाच्या पहिल्या महिला सभापती होण्याचा मान त्यांना मिळाला होता. स्थायी समिती व जैवविविधता समितीच्या सदस्या म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. भाजपच्या तिकिटावर त्या निवडून आल्या होत्या. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या त्या समर्थक होत्या.

हेही वाचा: फडणवीस यांना नेता मानत नाहीत का? पंकजा मुंडेंनी दिलं उत्तर

सभागृह संख्या घटली

महापालिका सभागृहाची निर्वाचित सदस्य संख्या १२८ आहे. त्यातील अर्चना बारणे यांचे मंगळवारी निधन झाले आहे. गेल्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसचे चिखलीतील नगरसेवक दत्तात्रेय साने, आकुर्डीतील नगरसेवक जावेद शेख आणि भाजपचे दिघीतील नगरसेवक लक्ष्मण उंडे यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. त्यांच्या जागेवर अद्याप पोटनिवडणूक झालेली नाही. आता आगामी महापालिका निवडणूक सहा महिन्यांवर आल्याने पोटनिवडणूक होण्याची शक्यता मावळली आहे. त्यामुळे सभागृहातील चारही जागा रिक्त राहणार आहेत.

हेही वाचा: काँग्रेसचे बडी नेतेमंडळी पवारांच्या भेटीला; राजकीय चर्चांना उधाण

loading image