भाजपने मतदारांचा विश्वासघात केला; सचिन अहीर यांचा आरोप

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिवसेना गटनेत्यांच्या कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत अहीर बोलत होते.
sachin ahir
sachin ahirSakal media

पिंपरी - पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील मतदारांनी २०१७ मध्ये मोठ्या विश्वासाने भाजपला महापालिकांत एकहाती सत्ता दिली. पण, भाजपने मतदारांचा विश्वासघात केला आहे, असा आरोप शिवसेना संपर्कप्रमुख सचिन अहीर यांनी केला.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिवसेना गटनेत्यांच्या कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत अहीर बोलत होते. ते म्हणाले, ''शहरात देशभरातून नागरीक रोजगारासाठी स्थायिक झाले आहेत. त्यांना उत्कृष्ट दर्जाच्या सेवासुविधा देण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार कटिबध्द आहे. पण, २०१७ मध्ये महापालिकेत भाजपची सत्ता आल्यापासून विकासाला खीळ बसली आहे. शहरात स्मार्ट सिटीचे प्रकल्प राबवित असताना भ्रष्टाचार केला आहे. याबाबत खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना अहवाल सादर केला आहे. लवकरच त्यावर कारवाई होईल. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईप्रमाणे पिंपरी-चिंचवडचा विकास करण्याचे नियोजन केले आहे.'

sachin ahir
मावळ तालुक्यातील १५ ग्रामपंचायतीच्या १९ जागांपैकी १५ जागा बिनविरोध

शिवसेना गटनेते राहुल कलाटे, शहरप्रमुख सचिन भोसले, महिला शहर संघटक उर्मिला काळभोर, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, सहसंपर्क प्रमुख योगेश बाबर, नगरसेवक अमित गावडे, शहर संघटक सचिन सानप, गोपाळ मोरे आदी उपस्थित होते.

माजी केंद्रीय मंत्री किरीट सोमय्या या शहरात येऊन भाजपचे कोडकौतुक करतात. परंतु, भाजपने केलेल्या भ्रष्टाचारावर दुर्लक्ष करतात. भाजपने गेल्या पाच वर्षात शहरासाठी केलेले कोणतेही पाच प्रकल्प दाखवावेत असे आव्हानही अहिर यांनी केले.

भाजपच्या भ्रष्टाचारी राजवटीला आता मतदार भुलणार नाहीत. पुढील निवडणूकांसाठी शिवसेनेची संघटनात्मक बांधणी सुरु आहे. या महिना अखेरपर्यंत पिंपरी चिंचवड शहरातील नागरीकांशी संवाद साधण्यासाठी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचा दौरा होणार आहे. महापालिकेच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी पायाभूत सेवासुविधा उभारणे आवश्यक आहे. यासाठी स्थानिक पातळीवर व्यवस्थापन करुन मतदारांना अपेक्षित असणारे प्रकल्प उभारले जातील यासाठी मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली आदित्य ठाकरे नेतृत्व करणार आहेत. मागील दोन वर्षात महाराष्ट्रावर आलेल्या सर्व संकटांचा सामना पारदर्शकपणे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मोठ्या आत्मविश्वासाने केला आहे. यासाठी केंद्राने कोणतीही मदत केली नाही असेही अहिर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com