esakal | ‘पिंपरी-चिंचवड पुणे मेट्रो’साठी भाजपचे पिंपरीत आंदोलन
sakal

बोलून बातमी शोधा

‘पिंपरी-चिंचवड पुणे मेट्रो’साठी भाजपचे पिंपरीत आंदोलन

‘पिंपरी-चिंचवड पुणे मेट्रो’साठी भाजपचे पिंपरीत आंदोलन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : पुणे (pune) व पिंपरी-चिंचवड (pimrpi chinchwad) शहरातील संयुक्त प्रकल्प असलेल्या मेट्रोचे ‘पुणे मेट्रो’ असे नाव आहे. ते ‘पिंपरी-चिंचवड पुणे मेट्रो’ करावे, या मागणीसाठी शहर भाजपने आंदोलन केले.

भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष संकेत चोंधे यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी चौकात आंदोलन झाले. मेट्रोच्या खांबांवर ‘पिंपरी-चिंचवड पुणे मेट्रो’ अशा आशयाचे स्टिकर चिटकविण्यात आले. युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अनुप मोरे, पश्‍चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख तुषार हिंगे, युवा मोर्चा सरचिटणीस जवाहर ढोरे, दिनेश यादव, तेजस्विनी कदम, गणेश जवळकर, उपाध्यक्ष प्रसाद कस्पटे, अतुल बोराटे, सन्नी बारणे, सुमीत घाटे आदी उपस्थित होते.

‘मेट्रोच्या नावात तुम्ही बदल करण्यास चालढकल करत असाल, तर आम्हाला कळवा. आम्ही नाव बदलून घेऊ, पण खपवून घेणार नाही.मेट्रोसाठी शहराचा मोलाचा वाटा आहे. तरीसुद्धा आमच्या शहराला डावलले जात असेल व शहराच्या अस्मितेवरच घाला घातला जात असेल तर आम्ही शांत बसणार नाही,’ असा इशारा चोंधे यांनी दिला. आपले अस्तित्व व अस्मितेची लढाई मजबूत करण्यासाठी शहरातील नागरिकांनी मैदानात उतरून हक्क मिळवला पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.

loading image
go to top