esakal | भोसरीत महिला अत्याचाराविरोधात भाजपचे आक्रोश आंदोलन 
sakal

बोलून बातमी शोधा

भोसरीत महिला अत्याचाराविरोधात भाजपचे आक्रोश आंदोलन 

राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात भाजपतर्फे पीएमटी चौकात आक्रोश आंदोलन छेडण्यात आले.

भोसरीत महिला अत्याचाराविरोधात भाजपचे आक्रोश आंदोलन 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

भोसरी : "महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना समाजाने नपूंसक केले पाहिजे. महिलांनी जिजाऊंचा आदर्श डोळ्यांपुढे ठेऊन महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांविरुद्ध लढण्यासाठी तलवार हातात घेतली पाहिजे. महिलांवरील होणारे अत्याचार नाहीसे करण्यासाठी महिलांनीच आपल्या मुलांना चांगली शिकवण देण्याची गरज आहे,'' असे मत महापौर उषा ढोरे यांनी येथे व्यक्त केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात भाजपतर्फे पीएमटी चौकात आक्रोश आंदोलन छेडण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. भाजपचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, नगरसेविका प्रियांका बारसे, सीमा साळवे, आशा शेडगे, सुजाता पालांडे, अनुराधा गोरखे, स्वीनल म्हेत्रे, अश्‍विनी जाधव, झामाबाई बारणे, विकास डोळस, विलास मडिगेरी, कुंदन गायकवाड आदी उपस्थित होते. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

लांडगे म्हणाले, "राज्यातील आघाडी सरकारला सर्वच बाबतीत अपयश आले आहे. राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनाही वाढल्या आहेत. सरकारने नराधमांना कठोर शिक्षा केली पाहिजे. मात्र, भाजप सरकारवरच अवलंबून न राहता महिलाविरोधी होणाऱ्या अत्याचाराविरोधात लढण्यासाठी भाजप महिला ब्रिगेडची स्थापना करणार आहे. महिलांना संरक्षण देण्याबरोबरच समाजात अशा घटना न होण्यासाठी आणि नराधमांवर अंकुश बसविण्यासाठी हे ब्रिगेड कार्यरत असेल.'' 

पिंपरी-चिंचवडमध्ये गुरुवारी कोणत्या भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार, वाचा

याप्रसंगी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, सरचिटणीस विजय फुगे, प्रदेश सचिव अमित गोरखे, प्रदेश कोशाध्यक्षा शैला मोळक, नगरसेवक एकनाथ पवार, भाजपा महिला अध्यक्षा उज्ज्वला गावडे, नगरसेविका सीमा साळवे यांनीही मत व्यक्त केले. भाजप कार्यकर्त्यांद्वारे आघाडी सरकारविरोधात घोषणा देत भोसरी परिसरातून मोर्चा काढण्यात आला. महिलांवर होणारे अत्याचार थांबविण्यासाठी विविध उपाययोजना करण्याच्या मागणीबरोबरच आघाडी सरकारचा निषेध करणारे निवेदन पिंपरी-चिंचवड अप्पर तहसील कार्यालयात देण्यात आले. मोरेश्‍वर शेडगे यांनी सूत्रसंचालन केले. नगरसेवक राजेंद्र यांनी आभार मानले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा