मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानुसार लोणावळ्यात घेण्यात आला 'हा' उपक्रम 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 27 July 2020

येथील शिवजयंती उत्सव मंडळ व शिवसेनेच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात १८० जणांनी रक्तदान केले.

लोणावळा (पुणे) : येथील शिवजयंती उत्सव मंडळ व शिवसेनेच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात १८० जणांनी रक्तदान केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनानुसार तसेच, मावळ शिवसेनेचे संस्थापक कै. उमेश शेट्टी व शंकर मोरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवजयंती उत्सव मंडळ, शिवसेना परिवाराच्या वतीने व पिंपरी सर्जिकल इन्स्टिट्यूट ब्लड बॅंक यांच्या सहकार्याने हे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरीच्या वायसीएम रुग्णालयात भाजप नगरसेवकाचा धिंगाणा; डॉक्टरांचे काम बंद आंदोलन

कार्यक्रमास माजी जिल्हा प्रमुख मच्छिंद्र खराडे, माजी नगरसेवक भालचंद्र खराडे, दत्ता दळवी, दिपक हुंडारे, सुनील इंगुळकर, उल्हास भांगरे, विशाल पाठारे, शंकर जाधव, शामबाबु वाल्मिकी, नरेश घोलप आदींसह शिवजयंती उत्सव मंडळाच्या पदाधिकारी उपस्थित  होते. कोविड-१९ संसर्गामुळे सरकारच्या नियमांचे पालन व मार्गदर्शन करण्याकरिता पोलिसांच्या वतीने सतिश कुदळे व नगरपरिषदेच्या वतीने अरविंद सोनवणे व दीपक शिंदे हे या वेळी उपस्थित होते. रक्तदात्यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढलेल्या महाराष्ट्र देशा आणि पहावा विठ्ठल बायोफोटोग्राफी पुस्तक भेट देत सन्मान झाला. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लोणावळा शहरचे पोलिस निरीक्षक मनोजकुमार यादव, ग्रामीणचे निरीक्षक संदीप घोरपडे यांचा कोरोना योद्धा म्हणून गौरव करण्यात आला. कोरोनाच्या लढ्यात रात्रंदिवस काम करणाऱ्या लोणावळा नगरपरिषद, आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी तसेच, महसूल विभागातील अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात येणार असल्याची माहिती माजी जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे यांनी दिली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: blood donation of 180 people in lonavla