'ते' एकमेकांना भेटले...प्रेम जडले...एकत्र राहायला लागले अन्...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 मे 2020

प्रियकरासोबत लिव्ह इन रिलेशिपमध्ये राहणाऱ्या विवाहितेचा प्रियकराने चारित्र्याचा संशय घेऊन गळा आवळून खून केला.

भोसरी ः प्रियकरासोबत लिव्ह इन रिलेशिपमध्ये राहणाऱ्या विवाहितेचा प्रियकराने चारित्र्याचा संशय घेऊन गळा आवळून खून केला. ही घटना मंगळवारी (ता. १९) रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास कासारवाडी येथे घडली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दीपाली अमर निकाळजे (वय २२, रा. भीमराव जवळकर चाळ, कासारवाडी) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. या खून प्रकरणी तिचा प्रियकर महेश मल्हारी खंडागळे (वय २८, रा. भीमराव जवळकर चाळ, कासारवाडी) याला ताब्यात घेतले आहे.

आता मोलकरणींना कामावर जाता येणार पण...

या विषयी मृत तरुणीच्या आईने भोसरी पोलिस ठाण्यात बुधवारी (ता. २०) फिर्याद दिली आहे. भोसरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दीपाली या पतीपासून वेगळ्या राहत होत्या. गेल्या नऊ महिन्यापासून त्या प्रियकर महेश याच्याबरोबर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये कासारवाडी येथे राहत होत्या. पुढील तपास भोसरी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश वाघमारे करत आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A boy killed her

टॅग्स
टॉपिकस