esakal | पिंपरीत  पोलिस निरीक्षकांच्या अवघ्या सात दिवसांत पुन्हा बदल्या 
sakal

बोलून बातमी शोधा

Police

पिंपरी चिंचवड पोलिस दलातील आठ पोलिस निरीक्षकांच्या गुरुवारी (ता. 19) रात्री अंतर्गत बदल्या करण्यात आल्या. यामध्ये अवघ्या सात दिवसांपुर्वी बदली झालेल्या चार निरीक्षकांचाही समावेश आहे. दरम्यान, अवघ्या सातच दिवसांत दुसऱ्यांदा बदल्या झाल्याने पोलिस अधिकाऱ्यांचेही धाबे दणाणले आहेत.

पिंपरीत  पोलिस निरीक्षकांच्या अवघ्या सात दिवसांत पुन्हा बदल्या 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी - पिंपरी चिंचवड पोलिस दलातील आठ पोलिस निरीक्षकांच्या गुरुवारी (ता. 19) रात्री अंतर्गत बदल्या करण्यात आल्या. यामध्ये अवघ्या सात दिवसांपुर्वी बदली झालेल्या चार निरीक्षकांचाही समावेश आहे. दरम्यान, अवघ्या सातच दिवसांत दुसऱ्यांदा बदल्या झाल्याने पोलिस अधिकाऱ्यांचेही धाबे दणाणले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी 13 नोव्हेंबरला तीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या केल्या. यामध्ये शहर पोलिस दलात नव्याने दाखल झालेल्या निरीक्षकांसह अगोदरपासूनच शहर पोलिस दलात कार्यरत असलेल्या 17 निरीक्षकांचा समावेश होता. या अधिकाऱ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी नेमणूक देण्यात आली. नवीन ठिकाणचा पदभार स्वीकारत नाही तोच यातील चार निरीक्षकांची गुरुवारी पुन्हा बदली करण्यात आली.

पिंपरी-चिंचवडमधील उद्योजकांना वीजबिलांचा शॉक; कोरोडो रुपयांची बिले थकीत  

नव्याने शहरात दाखल झालेले विलास सोंडे यांची मागील आठवड्यात नियंत्रण कक्षातून निगडी पोलिस ठाण्यात गुन्हे निरीक्षकपदी नेमणूक केली होती. आता गुरुवारी पुन्हा त्यांची देहूरोड पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकपदी नेमणूक केली आहे. यासह भास्कर जाधव यांची नियंत्रण कक्षातून दरोडा विरोधी पथकात नेमणूक केलेली असताना त्यांच्याकडेही गुरुवारी पुन्हा तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

Corona Updates : पिंपरी-चिंचवड शहरात आज 90 हजारांचा आकडा पार 

तसेच बालाजी सोनटक्के यांची गुन्हे शाखा युनिट 1 येथे नेमणूक केलेली असताना आता पुन्हा अंमली पदार्थ विरोधी पथकाची जबाबदारी देण्यात आली. यासह विठ्ठल कुबडे यांच्याकडे सामाजिक सुरक्षा पथकासह  जनसंपर्क अधिकारी पदाचीही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अधिकाऱ्यांचे नाव - कंसात सध्याची नेमणूक -  नवीन नेमणुकीचे ठिकाण 
विलास सोंडे (निगडी पोलिस ठाणे (गुन्हे) - वरिष्ठ निरीक्षक, देहूरोड पोलिस ठाणे) , भास्कर जाधव (दरोडा पथक -वरिष्ठ निरीक्षक, तळेगाव दाभाडे पोलिस ठाणे), मनीष कल्याणकर (देहूरोड पोलिस ठाणे-विशेष शाखा -1), अमर वाघमोडे (तळेगाव दाभाडे पोलिस ठाणे-गुन्हे शाखा युनिट -1), बालाजी सोनटक्के (गुन्हे शाखा युनिट 1-अंमली पदार्थ विरोधी पथक), श्रीराम पोळ (अंमली पदार्थ विरोधी पथक -दरोडा विरोधी पथक), पांडुरंग गोफणे (देहूरोड पोलिस ठाणे (गुन्हे)- -वाहतूक व नियोजन विभाग), विठ्ठल कुबडे (सामाजिक सुरक्षा पथक -सामाजिक सुरक्षा पथक व जनसंपर्क अधिकारी) .

Edited By - Prashant Patil