चोरीच्या 'या' स्टाईलमुळे त्याने अनेक मोठ्या चोऱ्या केल्या, पण...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 जुलै 2020

घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला चिखली पोलिसांनी अखेर जेरबंद केले आहे.

पिंपरी : घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला चिखली पोलिसांनी अखेर जेरबंद केले आहे. त्याच्याकडून घरफोडीचे सहा गुन्हे उघडकीस आले असून, साडे पाच लाखांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे. 

अभय देवराव जाधव (वय 19, रा. पाटीलनगर, चिखली, मूळ-नांदेड) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. जाधव याच्यावर चिखली पोलिस ठाण्यात पाच, तर निगडी ठाण्यात एक घरफोडीचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात तो फरारी होता. दरम्यान, जाधव हा चिखली परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून त्याला ताब्यात घेतले, त्याच्याकडे सखोल तपास केला असता त्याने गुन्ह्यांची कबुली दिली. 

Breaking : पिंपरी-चिंचवडकरांनो, लॉकडाउनचे हे नविन आदेश जाणून घ्या...

त्याच्याकडून सहा घरफोडीतील सोने, चांदी, सहा लॅपटॉप, ऑटो रिक्षा असा एकूण पाच लाख 33 हजारांचा माल पोलिसांनी हस्तगत केला. कटावणीने कडीकोयंडा उचकटून अथवा खिडकीवाटे घरात शिरून तो घरातील ऐवज लंपास करायचा. चिखली पोलिस अधिक तपास करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: burglars were arrested by police