महागड्या श्‍वानांची आता ऑनलाइन खरेदी

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 3 December 2020

दारात साखळदंडाने बांधलेला पाळीव श्‍वान आणि त्याला घेऊन ‘मॉर्निग वॉक’ करणे पिंपरी-चिंचवडकरांचा आवडीचा विषय आहे. त्यामुळे सध्या उत्तमोत्तम जातीचे श्‍वान खरेदी करण्याचा ट्रेंड वाढला आहे. मात्र, शहरात मोजक्‍या जातीचे श्‍वान असल्यामुळे थेट दिल्ली, हरियाना, मुंबई, चेन्नई व बेंगळुरूहून विदेशी श्‍वानांची ‘ऑनलाइन’ खरेदी करण्यात येत आहे.

उत्तमोत्तम जातीचे प्राणी पाळण्याचा ट्रेंड; दिल्ली, चेन्नईमधून विमानाने आणतात पिले
पिंपरी - दारात साखळदंडाने बांधलेला पाळीव श्‍वान आणि त्याला घेऊन ‘मॉर्निग वॉक’ करणे पिंपरी-चिंचवडकरांचा आवडीचा विषय आहे. त्यामुळे सध्या उत्तमोत्तम जातीचे श्‍वान खरेदी करण्याचा ट्रेंड वाढला आहे. मात्र, शहरात मोजक्‍या जातीचे श्‍वान असल्यामुळे थेट दिल्ली, हरियाना, मुंबई, चेन्नई व बेंगळुरूहून विदेशी श्‍वानांची ‘ऑनलाइन’ खरेदी करण्यात येत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

श्‍वान पाळणे ही पारंपरिक संकल्पना जाऊन नव्या ट्रेंडनुसार ‘फॅमिली मेंबर’ झाले आहे. त्यामुळे शहरात विविध जातीचे श्‍वान पाळण्याकडे कल वर्षागणिक वाढत आहे. काही वर्षांपूर्वी लॅब्रेडॉर, जर्मन शेफर्ड, पग, पामेरिअन, डॉबरमॅन या मोजक्‍याच जातीची कुत्री दिसत. आता नवीन विदेशी जातीचे श्‍वान थेट ‘ऑनलाइन’ मागविण्याचा ट्रेंड वाढला आहे. श्‍वानांबाबत लोकांमध्ये जागरूकता वाढली आहे. त्यांच्या आरोग्याची काळजी घेतानाच खाद्य, शाम्पू, गादी, खेळणी, पट्टे, साखळी याच्याकडे लोक आवर्जून लक्ष देतात, असे पशूवैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण दगडे यांनी सांगितले. 

पिंपरी-चिंचवड शहरात 223 नवीन रुग्ण; तर ९ जणांचा मृत्यू

महापालिकेकडे केवळ ४५० नोंद
पाळीव श्‍वानांची नोंदणी महापालिकेत करणे बंधनकारक आहे. शहरात १५ हजारांहून अधिक पाळीव श्‍वान आहेत. परंतु नोंदणीबाबत नागरिक अनुत्सुक आहे. तसेच केवळ एकाच कर्मचाऱ्यावर नोंदणीचा भार असल्याने त्याचाही परिणाम होत आहे. श्‍वान नोंदणीसाठी ७५ रुपये, तर नूतनीकरणासाठी दरवर्षी ५० रुपये नोंदणी शुल्क आकारले जाते. महापालिकेकडे फक्त ४५० श्‍वानांची नोंद झाली आहे.

...तर वायसीएम पुन्हा कोविड सेंटर

लाख मोलाचे श्‍वानप्रेम
सध्या शहरात पॉमेरिअन, डॉबरमॅन, जर्मनशेफर्ड, लॅब्रेडॉर, बेल्जियम शेफर्ड, इंग्लिश मॉस्टिफ, पिट बुल, बिगल, डॅशहाउल, पग, सेंट बर्नार्ड, ग्रेडडेन, यॉर्कशायर, टेरिअर, बुलमॅस्टिफ,  निॲपोलिटनमॅस्टिफ, बॉक्‍सर आणि रॉटव्हिलर या कुत्र्यांना विशेष मागणी आहे. डौलदार रुबाब आणि संबंधित प्रजातीचे पुरेपूर गुण असलेल्या श्‍वानांची किंमत १० हजार ते दीड लाख रुपये आहे. बहुतेक श्‍वानांची किंमत ५० हजार रुपयांपेक्षा अधिक आहे. विशेष म्हणजे श्‍वानप्रेमी भरमसाट खर्च करून त्यांना जपत आहेत. हवामान बदलल्यानंतर त्यांना तपासण्यासाठीदेखील दवाखान्यात गर्दी होत आहे. 

पिंपरी चिंचवड महापालिक राबविणार कुष्ठरोग, क्षयरोग निदान मोहीम

अशी होतेय नोंदणी
वेगवेगळे गॅझेट आणि वेबसाइटद्वारे रुबाबदार श्‍वानांची नोंदणी होते. दिल्लीहून सर्वाधिक श्‍वान मागवले जात असून, एखादे श्‍वान पिलं देणार असेल, त्यावेळी त्यांची सोनोग्राफी केल्यानंतरच पिलांची संख्या पाहून ‘बुकिंग’ होते. संबंधित ग्राहकाला किंमत सांगून नोंदणी करतात. ऑनलाइन खरेदीद्वारे दिल्लीहून अवघ्या तीन तासांत पिलू विमानाने केजमध्ये (चौकोनी हवेशीर पेटी) सुरक्षित येते. सुरक्षेमुळे ऑनलाइनचा फंडा भलताच लोकप्रिय होत आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Buy expensive dogs online now