Video : पिंपरीत मोटार-टेंपोचा विचित्र अपघात; महिला गंभीर जखमी 

Video : पिंपरीत मोटार-टेंपोचा विचित्र अपघात; महिला गंभीर जखमी 

पिंपरी : पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात मोटार व तीन चाकी टेंपोचा विचित्र अपघात झाला. यामध्ये टेपोंतील महिला गंभीर जखमी झाली आहे. ही घटना रविवारी (ता.24) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. 

नाशिक फाट्याकडून पिंपरी चौकाकडे (एमएच 12, क्‍युडब्ल्यू 7819) येत असलेली मोटार व नेहरूनगरकडून पिंपरी चौकाकडे येत असलेल्या तीन चाकी टेंपोची पिंपरी चौकात जोरात धडक झाली. या अपघातात भरधाव मोटार चौकातील दुभाजकावर धडकली. तर टेंपो बीआरटीएस मार्गिकेच्या लोखंडी बॅरिगेडसला जाऊन धडकला. ही धडक इतकी जोरात होती की धडकल्यानंतर हा टेंपो मागील दोन चाकांवर अक्षरश: उभा राहिला. तर मोटारीच्याही समोरील भागाचा चक्काचूर झाला. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, अपघातग्रस्त टेंपोमध्ये चालकासह एक महिला होती. यामध्ये महिलेच्या डोक्‍याला गंभीर इजा झाली आहे. तसेच मोटारचालकही जखमी असून, सर्वांना उपचारासाठी तातडीने रूग्णालयात दाखल केले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर अपघातग्रस्त वाहने बाजूला घेण्यात आली. पिंपरी पोलिस अधिक तपास करीत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com