तेराव्या मजल्यावरून उडी मारून सीएची आत्महत्या; रहाटणीतील घटना

सकाळ वृत्तसेवा
Monday, 23 November 2020

इमारतीच्या तेराव्या मजल्यावरून उडी मारून 68 वर्षीय चार्टर्ड अकाऊंटटने (सीए) आत्महत्या केली.

पिंपरी : इमारतीच्या तेराव्या मजल्यावरून उडी मारून 68 वर्षीय चार्टर्ड अकाऊंटटने (सीए) आत्महत्या केली. ही घटना रहाटणीतील कोकणे चौकातील एका सोसायटीत सोमवारी (ता. 23) दुपारी दीडच्या सुमारास घडली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सुनील हेमचंद्र रानडे (वय 68, रा. फ्लॅट क्रमांक 506, बिल्डिंग ए, 19/13, कुणाल आयकॉन रोड, पिंपळे सौदागर) असे या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. रानडे हे चार्टर्ड अकाउंटट होते. सोमवारी सकाळी ते रहाटणीतील कोकणे चौकातील भूमी एलियन सोसायटीत फ्लॅट पाहण्यासाठी आले होते. दरम्यान, दुपारी दीडच्या सुमारास त्यांनी इमारतीच्या तेराव्या मजल्यावर खाली उडी मारली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मात्र, डोक्‍याला गंभीर दुखापत असल्याने उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही. याबाबतचा अधिक तपास वाकड पोलिस करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CA's suicide by jumping from the thirteenth floor at rahatani

Tags
टॉपिकस
Topic Tags: