पिंपरी: जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; तेरा जणांवर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 26 November 2020

बुधवारी (ता.25) दुपारी पावणे चारच्या सुमारास पठारे चौक ते लोहमार्ग नियोजित नव्वद फूट रस्त्याच्या बाजूला आरोपी अंदर-बाहर नावाचा जुगार एकत्रित खेळत असल्याची माहिती पथकाला मिळाली.

पिंपरी : अवैधरित्या जुगार खेळण्यासाठी गर्दी केली. यासह साथीच्या आजाराचा संसर्ग पसरविण्याचे कृत्य केल्याप्रकरणी सामाजिक सुरक्षा पथकाने तेरा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई दिघी येथे करण्यात आली. 

बँकेतील कामे उरकून घ्या; डिसेंबरमध्ये अर्धा महिना बँकेला सुट्टी​

अय्याज दाऊद शेख (वय 43, रा. लक्ष्मीनगर गल्ली क्रमांक 2, कोंढवा), रोहित भाऊसाहेब दाभाडे (वय 26, रा. दाभाडे वस्ती, चऱ्होली), अमोल फकिरबा थुंबाळे (वय 35, रा. वडगाव रोड, आळंदी रोड), साहिल रामदास दाभाडे (वय 25, रा. दाभाडे वस्ती, चऱ्होली), स्वप्नील राजाराम दराके (वय 28, रा. खांदवेनगर, वाघोली), शाम किसन भालेराव (वय 27, रा. खैरे साळुंखे वस्ती, काळूस), सतीश रामदास मेश्राम (वय 30, रा. वाघोली), सचिन अनिल नाणेकर (वय 32, रा. भारतमाता चौक, नागेश्‍वरनगर, मोशी), सुभाष ज्ञानेश्‍वर पवळे (वय 36, रा. रामनगर, गव्हाणेवस्ती, भोसरी), लक्ष्मण भिवा पाथरकर (वय 30, रा. भाडाळे वस्ती, वाघोली), सुनील उर्फ सोन्या कोंडीबा मुंगसे (रा. दाभाडे वस्ती, चऱ्होली), सतीश शिंदे अशी आरोपींची नावे आहेत. 

'मी स्वतः उमेदवार आहे, असं समजून आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा'; सुप्रिया सुळेंचं आवाहन

बुधवारी (ता.25) दुपारी पावणे चारच्या सुमारास पठारे चौक ते लोहमार्ग नियोजित नव्वद फूट रस्त्याच्या बाजूला आरोपी अंदर-बाहर नावाचा जुगार एकत्रित खेळत असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार छापा टाकला असता आरोपी हे जुगार खेळण्यासाठी मानवी सुरक्षितता धोक्‍यात येईल अशापद्धतीने एकत्रित जमले होते. साथीच्या आजाराचा संसर्ग पसरविण्यासाठी हयगयीची कृत्ये केल्याचे दिसून आले. याठिकाणी जुगार खेळण्यासाठी मोबाईल, रोख रक्कम, जुगार खेळण्याचा चार्ट, पत्त्यांच्या कॅटसह आरोपी आढळून आले. दरम्यान, याप्रकरणी दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा झाला असून पोलिस अधिक तपास करीत आहेत. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited By: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: case filed against thirteen gamblers in Dighi Pimpri