

CCTV Systems Provide Crucial Evidence, Enhancing Police Investigation
sakal
मंगेश पांडे
पिंपरी: गुन्ह्यांच्या तपासासह इतर हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही (क्लोज्ड-सर्किट टेलिव्हिजन) हे पोलिसांसाठी प्रभावी साधन ठरत आहे. शहरातील सार्वजनिक ठिकाणे, प्रमुख चौक, व्यावसायिक आस्थापना, बँका, एटीएम तसेच निवासी भागांत तैनात असलेल्या या कॅमेऱ्यांमुळे गुन्ह्यांचे स्वjtप, त्यातील आरोपी, त्याची तीव्रता आणि गुन्हा घडण्याची नेमकी पद्धत अधिक स्पष्टपणे समोर येत आहे. त्यामुळे तपासासाठीही मोठी मदत होत आहे.