Pimpri News : केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंग पटेल यांचा भोसरी दौरा

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्यावतीने लोकसभा कोअर कमिटी आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक प्रल्हाद सिंग पटेल यांनी घेतली.
central minister pralhad singh patel
central minister pralhad singh patelsakal
Summary

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्यावतीने लोकसभा कोअर कमिटी आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक प्रल्हाद सिंग पटेल यांनी घेतली.

पिंपरी - शिरूर लोकसभा मतदार संघातील आगामी निवडणुकीत विजयश्री खेचून आणण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्यावतीने मोर्चेबांधणी करण्यात येत असून, केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग आणि जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हाद सिंग पटेल यांनी काल मंगळवारी (ता. २२) रात्री भोसरी विधानसभा मतदार संघाचा दौरा केला.

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्यावतीने लोकसभा कोअर कमिटी आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक पटेल यांनी घेतली. यावेळी शिरुर लोकसभा निवडणूक प्रभारी, आमदार माधुरी मिसाळ, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे, माजी मंत्री बाळा भेगडे, ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, समन्वयक धर्मेंद्र खांडरे, जिल्हा परिषद गटनेता शरद बुट्टे पाटील, जिल्हा परिषद माजी सदस्या आशा बुचके, प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, सरचिटणीस विजय फुगे आदी उपस्थित होते.

यावेळी बूथ सक्षमीकरण, शक्ती केंद्र नियोजन आणि संघटनात्मक बांधणीबाबत आढावा घेण्यात आला. काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री रेणुका सिंह यांनी मतदार संघाचा दौरा केला होता. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंग पटेल यांनी दौरा केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com