Pimpri - Chinchwad : महिंद्रा लॉजिस्टिक च्या कामगारांना १२ हजार ८०० रुपयांची वेतनवाढ

स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटनेमुळे कामगारांना न्याय
 Pimpri - Chinchwad
Pimpri - Chinchwadsakal
Summary

स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटनेमुळे कामगारांना न्याय

पिंपरी : चाकण औद्योगिक वसाहतीमधील निघोजे येथील महिंद्रा लॉजिस्टिक लि. कंपनीमधील कामगारांना तब्बल १२ हजार ८०० रुपयांची वेतन वाढ मिळाली आहे. चाकण औद्योगिक पट्ट्यात लॉजिस्टिक उद्योग क्षेत्रातील कामगारांना आतापर्यंतची ही सर्वाधिक वेतनवाढ ‘भेट’ मिळाली आहे. त्यामुळे, कामगारांनी ‘डीजे’च्या तालावर नाचत, पेढे वाटून तसेच फटाक्यांची अतिषबाजी करत आनंद साजरा केला.

महिंद्रा लॉजिस्टिक लि. व स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटना यांच्यामध्ये झालेल्या दुसऱ्या वेतनवाढ करारावर संघटनेचे प्रमुख सल्लागार आमदार महेश लांडगे, रोहिदास गाडे, महिंद्रा कंपनीचे उपाध्यक्ष विजय नायर, उद्योजक संतोष शिंदे, संघटनेचे अध्यक्ष जीवन येळवंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. आमदार लांडगे यांनी कंपनी व्यवस्थापन आणि कामगार संघटना यांच्यात योग्य मध्यस्थी कामगारांना न्याय दिला आहे.

यावेळी संघटनेचे सल्लागार किसन बावकर, सरचिटणीस कृष्णा रोहोकले, चिटणीस रघुनाथ मोरे, उपाध्यक्ष शाम सुळके, खजिनदार अमृत चौधरी, संघटक तेजस बिरदवडे, दत्तात्रेय गवारे, भट्टू पाटील, युनिट अध्यक्ष प्रशांत पाडेकर, व्यवस्थापनाच्या वतीने महिंद्रा कंपनीचे उपाध्यक्ष प्रसन्ना पहाडे, एडविन लोबो, उपाध्यक्ष, मानव संसाधन विभाग प्रमुख प्रदीप झोटिंग, जोगिंदर सिंग, सुनील धानोरकर, श्रेयस आचार्य, शेखर करंजीकर, सरव्यवस्थापक, प्रकल्प प्रमुख मुकेश कपूर, मानव संसाधन विभागाचे सरव्यवस्थापक सतीश परब, मानव संसाधन विभागाचे उप सरव्यवस्थापक धीरज सिंह यांनी करारावर स्वाक्षरी केल्या आहेत. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रदीप झोटिंग यांनी केले. पूजा थिगळे यांनी सूत्रसंचालन केले. सरचिटणीस कृष्णा रोहोकले यांनी आभार मानले. धीरज सिंह यांनी कार्यक्रमाचा समारोप केला.

कामगारांना मिळालेले लाभ :

कामगारांना मिळवून दिलेल्या सर्व सुविधांच्या व्यतिरिक्त

  • - एकूण पगारवाढ - १२,८००/- ( बारा हजार आठशे रुपये)

  • - कराराचा कालावधी १ सप्टेंबर २०२२ ते २८ फेब्रुवारी २०२६ असा साडेतीन वर्षांचा राहील.

  • - मागील सर्व फरक कामगारांना देण्यास व्यवस्थापनाकडून मान्यता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com