
महापालिकेने निवासी क्षेत्रापासून मंडई दुसऱ्याठिकाणी विकसित करावी. अन्यथा स्थानिकांना रस्त्यावर उतरावे लागेल', अशा इशारा फेडरेशन ऑफ घरकुलच्या सभासदांनी दिला आहे.
पिंपरी (Pimpri News) - "गेल्या पाच वर्षात लोकप्रतिनिधी घरकुलमध्ये फिरकलेले नाहीत. त्यांनी कुठला विकास केला नाही. दरवर्षी घरकुलच्या आवारात पाणी साचते, ती समस्या सोडवता आली नाही. आता आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून विकास कामे हाती घेतली आहेत. पोलिसांचा धाक दाखवून भाजी मंडईचे काम सुरू केले आहे. घरकुलवासियांचा प्रस्तावित भाजी मंडईला विरोध आहे. महापालिकेने निवासी क्षेत्रापासून मंडई दुसऱ्याठिकाणी विकसित करावी. अन्यथा स्थानिकांना रस्त्यावर उतरावे लागेल', अशा इशारा फेडरेशन ऑफ घरकुलच्या सभासदांनी दिला आहे. याबाबत त्यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.
चिखली-घरकुलच्या गुरुकृपा इमारतीच्या समोरील मोकळ्या मैदानात स्थानिक लोकप्रतिनिधींनी भाजी मंडई बांधण्याचा चंग बांधला आहे. त्याला स्थानिकांनी कडाडून विरोध दर्शविला आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसापासून येथे पोलिस दंगल नियंत्रण पथक तैनात आहे. सध्या लहान मुलांना खेळण्याची मुभा देत येत नसल्याचे रत्ना गायकवाड यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री अजित पवार MPSCमध्ये लक्ष घालणार; रोहित पवारांच्या पत्राला दिला रिप्लाय
स्थानिकांच्या मागण्या
सत्यभामा जाधव : ""सांस्कृतिक हॉल किंवा खेळाचे मैदान विकसित करावे. मंडईमुळे अस्वच्छता पसरेल. गोंधळ वाढेल. ''
वैशाली गुंजाळ : ""मंडईसाठी वर्षभरापासून पाठपुरावा सुरू आहे. मात्र लोकप्रतिनिधी चार वर्षात एकदाही फिरकले नाहीत.''
नंदा गायकवाड : ""गाळे बांधून त्यांच्या मर्जीतील लोकांना देणार आहेत. त्यासाठी इथे कशाला गर्दी करायची.''
सुग्रीव पाटील : ""डोंगराळ भाग स्थानिकांनी स्वखर्चाने सपाट केला. आता त्यांना मंडईसाठी जाग आली. इतके दिवस कुठे होते.''
शाईन शिकलगार :""आरक्षण नसताना मंडई का विकसित केली जात आहे. ''
कविता देडे : ""आमच्या जिवाला धोका निर्माण झाल्यास राजकीय पदाधिकाऱ्यांना जबाबदार धरावे.''
''चंद्रकांत पाटलांनी पुन्हा कोल्हापूरला येऊन दाखवावं''
छाया चौधरी : ""स्थानिक लोकप्रतिनिधींनी पोलिसांना थांबवून काम करत आहेत.''
सुनीता बिरादार : ""घरकुलवासियांवर राजकीय दबाव टाकण्यात येत आहे. ''
मनीषा पाटील : ""काहीही झाले तरी चालेल, पण भाजी मंडई होऊ देणार नाहीत.''
स्वाती महाजन : ""घरकुलच्या विकासासाठी कोणी पुढे येत नाहीत. पण नावासाठी सगळ्यांना घरकुलची आठवण येते.''
शुभांगी यादव : ""मुलांना खेळायला जागा नाही. मंडईमुळे वाहतूक वाढेल''
"पैसे भरले तरी मीटर नाही; महावितरणचा अजब कारभार!
भाऊसाहेब डांगे : ""महापालिकेची जागा असली तरी स्थानिकांना जे हवे आहे, त्याची पूर्तता लोकप्रतिनिधींनी करावी.''
""नागरीवस्तीमध्ये भाजी मंडई नको. घरकुलच्या प्रवेशद्वारासमोर ही मंडई बांधल्यावर गर्दी होणार, अतिक्रमणे वाढणार. आमच्या मुलांनी खेळायचे कुठे? भाजी मंईड ऐवजी खेळाचे मैदान विकसित करावे.''
-सुधाकर धुरी, अध्यक्ष फेडरेशन ऑफ घरकुल